एक्स्प्लोर

Nashik Accident : अजून अठरा वर्ष पूर्णही नाही, तरीही मुलांच्या हाती गाड्या देताय? नाशिकमध्ये घडली दुर्दैवी घटना 

Nashik News : सद्यस्थितीत अनेक मुलांच्या हाती गाडी देणारे पालक कायद्याबाबत अनभिज्ञ आहेत कि काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Nashik Accident : नाशिकमध्ये (Nashik) दुचाकी अपघाताच्या घटना सातत्याने होत असून यामध्ये अल्पवयीन मुलांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे. अशातच मागील दोन दिवसात नाशिक शहरात दोन अल्पवयीन मुलांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अनेक मुलांच्या हाती गाडी देणारे पालक याबाबत अनभिज्ञ आहेत की काय? असा प्रश्न समोर आला आहे. 

नाशिकच्या अंबड सातपूर लिंक रोडवर (Ambad Satpur Link Road) मंगळवारी (27 जून) सकाळी साडेसहा वाजता सुमारास शिकवणीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळली. या अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचे निधन झाले. सार्थक दामू राहणे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो त्याचा मित्र भावेश केणे आणि योगेश केणे यांच्यासोबत सातपूर कॉलनी (Satpur Colony) दहावीच्या (10th STD) खाजगी शिकवणीसाठी दुचाकीवरुन जात होता. याचवेळी ज्योती फार्मजवळ त्यांची गाडी दुभाजकावर आदळल्याने सार्थक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तर त्याचे दोन्ही मित्र गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान सार्थकच्या मागे आई-वडील, बहिण, मोठा भाऊ असा परिवार आहे. सार्थक आणि त्याचे मित्र सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयात शिकत होते. अपघात घडला, त्या ठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील चेंबर खालीवर झाले असल्याचे समोर आले आहेत. दरम्यान सोमवारी नाशिक शहरातील बारावीतील विद्यार्थ्यांचा दुचाकी घसरुन मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी दहावीतील विद्यार्थ्यांचा ट्रिपल सीट जाताना मोटर सायकल अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. या दोन्ही दुर्दैवी घटनांमध्ये निष्पाप दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू (Two Wheeler Accident) झाला आहे. मात्र या घटनेमागे प्राथमिकदृष्ट्या हे दोघे चालकच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. त्यापलीकडेही या मुलांच्या हाती वाहन देणे योग्य होते का? याचाही पालकांनी पालकांनी सुज्ञपणे विचार करण्याची गरज आहे.

कायदा काय सांगतो? पालकांचे कर्तव्य काय? 

अनेक दिवसांपासून शहरात वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून हेल्मेटसक्ती केली जात आहे. ई-चलन फाडले जात आहेत. या मध्यमातून अनेक दुचाकी धारकांवर कारवाई केली जात आहे. मात्र पोलीस चिरीमिरी घेऊन वाहनधारकांना सोडून देत आहेत. दुसरीकडे रस्त्यावर अल्पवयीन मुलांकडे वाहने अधिक असल्याचे समोर आले आहे. एकीकडे कायद्यानुसार अल्पवयीन मुलाना वाहन चालवणे कायद्याने गुन्हा आहे. यानुसार मुलांच्या पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे नमूद आहे. मात्र पोलिसांकडून सर्रास याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा अपघातांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पालकांनी याबाबत सजग राहून आपलं पाल्य वाहन चालवण्यासाठी पात्र आहे का? वाहन परवाना आहे का? या गोष्टीकडे लक्ष देणे देखील त्यांचं कर्तव्य असल्याचे या घटनांवरुन दिसून येत आहे. 

पावसाळ्यात काय काळजी घ्यावी? 

पावसाळ्यात रस्त्यावरील वाहन पाण्यातून वाहन चालवताना रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत परिणामी अपघातांचे प्रमाण वाढते आहे. वाहनांची योग्य तपासणी करुन घ्या. वाहनांचे हेडलाईट्स ब्रेक लाईट्स इंडिकेटर्स, वायपर्स आणि टायरमध्ये हवा आहे का? हे सर्व तपासून बघा, मगच गाडी सुरु करा. रस्त्यावर तुमच्या अस्तित्वाची जाणीव होण्याकरता हेडलाईट कायम सुरु ठेवा, सुरक्षित अंतर ठेवा, पाणी साचलेल्या परिसरात वाहन चालवताना एकाच लेनमध्ये गाडी चालू चालवा, ओव्हरटेक करणे टाळा, अचानकपणे ब्रेकचा वापर टाळा या सूचना तंतोतंत पाळणे आवश्यक आहे.

हेही वाचा

Nashik Accident : निफाडच्या शिरवाडे गावावर दुःखाचा डोंगर, तीन मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, बसचालक फरार 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्टABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 18 February 2024Disha Salian Aditya Thackeray Majha Mudda EP 4 : वकिलाचे दावे ते ठाकरेंवर आरोप; काय आहे प्रकरण?Aaditya Thackeray Chandrashekhar Bawankule Meet : आदित्य ठाकरे-बावनकुळे यांची विधान भवनात भेट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
Embed widget