मोठी बातमी : सोनू सूदच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर अपघात; कारची ट्रकला धडक
Sonu Sood wife accident : समृद्धी महामार्गावर अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा अपघात झालाय.

Sonu Sood wife accident : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या पत्नीचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झालाय. यामध्ये सोनू सूदची पत्नी जखमी झाली आहे. मात्र, सोनू सूदची पत्नी सुखरुप असून चिंता करण्यासारखी बाब नसल्याचं सांगितलं जात आहे. सोनाली सूदचा कार एका कारला धडकल्याची माहिती आहे.
View this post on Instagram
सोनू सूद याची पत्नी सोनाली सूद हिचा समृद्धी महामार्गावर नागपूरमध्ये सोमवारी (दि.25) अपघात झालाय. यावेळी कारमध्ये सोनाली सूद आणि तिच्या बहिणीचा मुलगा आणि एक महिला देखील होती. कार एका ट्रकला धडकली. मात्र, कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. दरम्यान, पत्नी सोनाला भेटण्यासाठी सोनू सूद आज (दि.25) नागपूरमध्ये पोहोचलालाय.
सोनू सूदच्या पत्नी सुखरुप
अधिकृत माहितीनुसार, सोनू सूदची पत्नी सोनाली हिचा अपघात झालाय, मात्र चिंता करण्यासारखं काही नसल्याची माहिती आहे. सध्या तिच्या वैद्यकीय अहवालाची सर्वजण प्रतिक्षा करत आहेत. सोनू सूदने देखील त्याच्या पत्नीच्या अपघाताबाबत अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही. सोनाली सूद अनेकदा चर्चेत आली आहे. सोनू सूद गरिबांना आणि गरिबांना मदत करण्यासाठी ओळखला जातो. बॉलिवूडमधील सिनेमांशिवाय त्याने सामान्य नागरिकांना मदत करण्याची वृत्ती कायम ठेवली आहे.
सोनू सूदने 1996 मध्ये केला होता सोनालीशी विवाह
सोनू सूदने 1996 मध्ये सोनालीशी लग्न केले. ती एक तेलुगू आहे, जी मूळची आंध्र प्रदेशची आहे. सोनू सूदला अयान आणि इशांत अशी दोन मुले आहेत. सोनालीने नागपूर विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. तो व्यवसायाने प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे, सोनू आणि सोनाली सूद यांना त्यांचे वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत नसतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या























