Nashik History : नाशिक शहराला नाव कस पडलं? जाणून घ्या नावामागचा इतिहास
Nashik History : नाशिकला नाशिक हे नाव कस पडलं किंवा कुणी दिलं हे पाहणं महत्वाचं आहे.
Nashik History : प्रत्येक गाव किंवा शहर म्हटलं कि त्याला विशेष असा इतिहास असतो. तसाच नाशिक (Nashik) शहराला देखील आहे. नाशिक शहराला सद्यस्थितीत मंदिराचे शहर म्हणूंनही ओळखले जाते. मात्र नाशिक नावामागे रंजक इतिहास सांगितलं जातो. नाशिकला नाशिक हे नाव कस पडलं किंवा कुणी दिलं हे पाहणं महत्वाचं आहे.
नाशिक शहर हे पूर्वीपासूनच धार्मिक, ऐतिहासिक व पौराणिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात असंख्य अशी मंदिरे (Temples) पाहायला मिळतात. त्यामुळे नाशिक शहरात हजारोच्या संख्येने दररोज भाविक (Devotees) तसेच पर्यटक या ठिकाणी दाखल होतात. शिवाय या ठिकाणी धार्मिक स्थळे तर अनेक आहेतच मात्र निसरग सौंदर्याने नाशिक नागरी भरभरून नटलेली आहे. त्याचबरोबर देशातील महत्वाच्या नद्यांपैकी एक असलेल्या गोदावरीच्या काठावर नाशिक शहर वसलेले आहे. त्यामुळे नाशिकला जगभरात विशेष ऐतिहासिक महत्व आहे. महत्वाचं म्हणजे नाशिक शहराला नाशिक हे नाव पडण्यामागे रामायणाचा (Ramayana) उल्लेख केला जातो.
नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. नाशिक हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणौन ओळखले जाते. त्याचबरोबर नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. प्रत्येक गावाला किंवा शहराला त्याचा एक इतिहास असतो. तसेच त्या गावाला किंवा शहराला त्याचे मूळ नाव देखील असते. ‘नासिक शहर’ देखील असेच ऐतिहासिक शहर असून गोदावरी नदी काठावर वसलेले आहे. याच गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रम्हगिरीच्या कुशीत झाला आहे आणि गोदावरी नाशिक शहरातूनच पुढे जाते. विशेष म्हणजे याच गोदावरीच्या तीरावर रामकुंड परिसर असून तो देशभरात प्रसिद्ध आहे. अनेक धार्मिक विधी होत असल्याने तसेच अस्थी विसर्जन होत असल्याने जगभरातून भाविक अस्थी विसर्जनासह इतर विधी करण्यासाठी नाशिक शहरात येतात. अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे नाशिक शहरात दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो.
नाशिक नावामागचा इतिहास
पूर्वी नाशिकला किष्किंधा नगरी तसेच मुघल काळात गुलशनाबाद नावाने ही ओळखल जायचं. मात्र, नाशिक नावाबाबत अशी आख्यायिका आहे कि, रामायणातील महत्वाची पात्रे असलेल्या श्रीराम, लक्ष्मण या दोघा बंधूनी वनवास काळात शहरातील पंचवटी परिसरात वास्तव्य केले आहे. पंचवटी परिसरात फिरत असताना शूर्पनखेचे नाक लक्ष्मणाने कापले होते. नाकाला नासिका असे म्हटले जाते. याच नावावरून पुढे नाशिक नाव पडल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर आणखी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी कि, गोदावरीच्या तीरावरील नऊ टेकड्यांवर हे गाव वसले म्हणून ते ‘नवशिख’ म्हणून ओळखले जायचे. याच नवशिख शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन ‘नाशिक’ हे नाव पडले. याचे उदाहरण म्हणून नऊ टेकड्या आपल्याला नाशिक शहरात आजही पाहायला मिळत असल्याचे जाणकार सांगतात.