एक्स्प्लोर

'...म्हणून मोहम्मद शामीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विकेट घेतली नाही'; सोशल मीडियावरील त्या पोस्टवर आदित्य ठाकरे संतापले

Aditya Thackeray: माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एक्सवर पोस्ट करत हल्लाबोल केला आहे. 

Aditya Thackeray: सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची (Champions Trophy 2025) स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत सुरु आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan) सामना 23 फेब्रुवारी खेळवण्यात आला. हा सामना दुबईत झाला. भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गजांनी मैदानात उपस्थिती लावली होती. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर देखील उपस्थित होते. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद अफ्रिदीसोबत अनुराग ठाकूर सामना पाहताना दिसले. यावरुन आता माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एक्सवर पोस्ट करत हल्लाबोल केला आहे. 

अंधभक्त देशाला कुठे घेऊन जात आहेत ह्याचे हे उदाहरण आहे. मोहम्मद शमी आणि जावेद अख्तर यांच्यावर त्यांच्या देशभक्तीबाबत शंका घेतली जाते, का तर केवळ त्यांच्या धर्मामुळे...दोघेही भारतीय, आपल्या कर्तृत्वाने देशाच्या गौरवात भर घालणारे आहेत.  पण हेच ट्रोल्स त्या भाजप नेत्यावर बोलायला घाबरतात, जो आपल्या देशाच्या विरोधात उघडपणे बोलणाऱ्या क्रिकेटपटूसोबत काल बसलेला दिसला. ज्यांचा पक्ष प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्यांना “पाकिस्तानला जा” असे वारंवार सांगतो, त्यांचे माजी मंत्री स्वतः रस्त्यावर “देश के गद्दारों को...." च्या घोषणा देतात, तेच काल शाहीद आफ्रिदी सोबत गप्पा मारत होते. मग सांगा, आता देशाचे गद्दार कोण?, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. 

...त्याला देशविरोधी ठरवले गेले असते- आदित्य ठाकरे

विचार करा, जर तो नेता भाजपचा नसता, तर काय झालं असतं?, त्याच्याविरोधात आंदोलनं, एफआयआर झाले असते. त्याला देशविरोधी ठरवले गेले असते आणि त्यालाही “पाकिस्तानला जा” असे म्हटले असते. त्यावर ठराविक प्रसारमाध्यमांमध्ये वादविवाद झाले असते ते वेगळेच.... दुर्दैवाने, हीच भाजपची नीती आहे; देशांतर्गत फूट पाडा, आपापसात भांडणे लावा, हिंदू-मुसलमानांमध्ये द्वेष पसरवा आणि सत्ता मिळवा. आत्ताही हे पाकिस्तानात बसून आपल्या देशाबद्दल वाईट उद्गार काढणाऱ्यांसोबत गप्पा मारत बसले आहेत. ह्यांचे नेते,नेत्यांची मुले परदेशी व्यवसाय करतात.. काही तर देशविरोधी लोकांसोबत क्रिकेटच्या बहाण्याने पार्ट्या करतात, मॅच बघतात. बाकीच्यांची मुलं, आमचे तरुणांना मात्र - हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर घोषणा आणि आंदोलनात पुढे ठेवतात आणि हो, जेव्हा भाजपच्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी, बांगलादेशातील हिंदूंवर हल्ले होत असल्याचे सांगितले, तेव्हा ह्याच भाजपशासित बीसीसीआयने मात्र सगळं माहित असूनही त्याच बांगलादेशसोबत क्रिकेट सामना खेळवला, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. 

आमची देशभक्ती आणि हिंदुत्व स्पष्ट आहे- आदित्य ठाकरे

निवडणुका झाल्याने भाजप आता हिंदूना विसरलंय आणि देशभक्तीही विसरंलय. ..की मग आता भाजपच्या देशभक्तीचा  “टाइम प्लीज” आहे?, जेव्हा ते तुम्हाला पुन्हा देशभक्ती आणि हिंदुत्व शिकवायला येतील, तेव्हा त्यांना त्यांच्या नेत्याचा, भारतविरोधी क्रिकेटपटूसोबत आनंद घेतानाचा फोटो दाखवा आणि विचारा, हे त्यांना मान्य आहे का?, आमची देशभक्ती आणि हिंदुत्व स्पष्ट आहे, भाजपसारखी चुनावी नाही. देशप्रेम आणि हिंदुत्व म्हणजे एकमेकांचा आदर करु, पण कोणत्याही प्रकारचा तिरस्कार-द्वेष सहन केला जाणार नाही, कोणाकडूनही नाही, कोणासाठीही नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

मोहम्मद शामीविरोधात सोशल मीडियावर ती पोस्ट-

मोहम्मद शामी आज त्यांच्या संघाकडून खेळत आहे. प्रत्येक वेळी त्याने विकेट्स घेतल्या आहेत, पण पाकिस्तानविरुद्ध त्याने त्याचा खरा रंग दाखवला, अशी पोस्ट एका अकाऊंटवरुन सोशल मीडियावर करण्यात आली होती.

आदित्य ठाकरेंची संपूर्ण पोस्ट- 

संबंधित बातमी:

Devendra Fadnavis On Neelam Gorhe: देवेंद्र फडणवीसांनी नीलम गोऱ्हेंचे टोचले कान; म्हणाले, साहित्य संमेलनात बोलताना काही...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget