Ranveer Allahbadia Statement Controversy Case: ना ना, हो हो करता करता अखेर रणवीर अलाहाबादियानं सायबर सेलसमोर जबाब नोंदवला; मीडियाचे कॅमेरे पाहून तोंड लपवलं VIDEO
Ranveer Allahbadia Statement Controversy Case: इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये आई-वडिलांबाबत अश्लील टिप्पणी केल्यापासून रणवीर अलाहाबादिया चर्चेत आहे. चोहीकडून त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

Ranveer Allahbadia Statement Controversy Case: इंडियाज गॉट लेटेंट (Indias Got Latent) शोमधील अश्लील कमेंट्स प्रकरणी, युट्यूबर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) आणि आशिष चंचलानी (Ashish Chanchlani) यांनी आज महाराष्ट्र सायबर सेलच्या मुख्यालयात जाऊन आपला जबाब नोंदवला. इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये आई-वडिलांबाबत अश्लील टिप्पणी केल्यापासून रणवीर अलाहाबादिया चर्चेत आहे. चोहीकडून त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
दरम्यान, रणवीर अलहाबादियाला चौकशीसाठी महाराष्ट्र सेलकडून समन्स बजावण्यात आलं होतं. तसेच, गेल्या अनेक दिवसांपासून रणवीरशी सायबर सेलचा संपर्क होत नसल्याचंही बोललं जात होतं. अखेर रणवीर अलहाबादियानं महाराष्ट्र सायबर सेलच्या मुख्यालयात उपस्थित राहत आपला जबाब नोंदवल्याची माहिती मिळत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये आई-वडिलांबाबत अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी चौकशी करणाऱ्या तिनही एजन्सी गेल्या काही दिवसांपासून रणवीरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या. पण, रणवीरशी संपर्क होत नव्हता. या प्रकरणात रणवीर अलाहाबादियानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, रणवीरला न्यायालयानं दिलासा दिला, त्याची अटक थांबवण्यात आली आणि त्याला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले.
रणवीर अलाहाबादिया, आशिष चंचलानी दोघांनीही नोंदवले जबाब
इंडियाज गॉट लेटेंट शोमधील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणवीर आणि आशिष चंचलानी या दोघांनीही त्याचे जबाब नोंदवले आहेत. महाराष्ट्र सायबरनं सुमारे 2 तास दोघांचेही जबाब नोंदवले. महाराष्ट्र सायबरनं या प्रकरणात आतापर्यंत 40 जणांना चौकशीसाठी समन्स पाठवलं, त्यापैकी 5 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
#WATCH | Maharashtra: YouTubers Ashish Chanchlani and Ranveer Allahbadia leave from the Maharashtra Cyber Cell Headquarters in Navi Mumbai after recording their statements in connection with India's Got Latent case. pic.twitter.com/zpNIrz6XZK
— ANI (@ANI) February 24, 2025
जबाब नोंदवल्यानंतर रणवीर अलाहाबादिया मुख्यालयातून बाहेर आला. त्यावेळी माध्यमांचे कॅमेरे पाहून रणवीरनं तोंड लपवलं आणि गाडीत जाऊन बसला. यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
