Dasara Ravan : विजयादशमीला रावण दहन नाही पूजन करा; आदिवासी संघटना आक्रमक
Dasara Ravan : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील काही आदिवासी संघटनांनी विजयादशमीला होणाऱ्या रावण (ravan) दहनास विरोध केला आहे
Dasara Ravan : गेल्या अनेक वर्षांपासून दसऱ्याच्या (Dasara) दिवशी रावण (Ravan) दहन करण्याचे परंपरा आहे. मात्र अलीकडच्या वर्षात रावण दहन करण्यास आदिवासी संघटनांचा (Trible Union) विरोध होत आला आहे यंदा देखील मोठ्या उत्साहात नवरात्री उत्सव साजरा होत असताना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील काही आदिवासी संघटनांनी विजयादशमीला होणाऱ्या रावण दहनास विरोध केला आहे.
दसऱ्याच्या (Dasara) दिवशी रावणाचे प्रतिमेचे दहन करण्यास नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा (Surgana), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तथा सटाणा तालुक्यातील आदिवासी बचाव अभियानाने आदिवासी विकास संघटनांनी विरोध केला आहे. शिवाय रावण दहन केल्यास त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील संघटनांनी पोलिसांकडे केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रावण दहनाची प्रथा सुरू आहे. दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. मात्र अलीकडच्या वर्षात रावणाच्या प्रतिमेचे दहन करणाऱ्या विरुद्ध आदिवासी संघटनांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. दसऱ्याच्या दिवशी राजा रावण दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्राच्या आदिवासी बचाव अभियान आणि सर्व आदिवासी संघटनांनी एकत्र येत सटाणा पोलीस निरीक्षक सुभाष अनमोलवर आणि पोलीस अधिकारी पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
आदिवासी संघटनांच्या मते रावण हा विविध गुणांचा समुच्चय आहे. तो संगीतज्ञ, राजनीति तज्ञ, उत्कृष्ट शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी होता. असे असताना त्याच्या प्रतिमेचे दहन करून त्याला व त्याच्या गुणांना अपमानित करणे चुकीचे आहे. रावण दहन कार्यक्रमातून दलित, आदिवासी, अनुसूचित जाती जमाती समाजाचा अपमान होत असल्याने या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याची मागणी संबंधित संघटनांनी केली आहे. तसेच कोणी हा कार्यक्रम केल्यास त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आदिवासी संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.
काय म्हटलय निवेदनात
रावण हा सर्वांना न्याय देणारा न्यायप्रिय राजा होता. असे असताना इतिहासाचे विकृतीकरण करून रावणाला खलनायक ठरविण्यात आले. तसेच दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. राजा रावणासारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही. तामिळनाडूमध्ये तर रावणाची 352 मंदिरे असून सर्वात मोठी मूर्ती मध्यप्रदेशात असल्याचे निवेदन म्हटले आहे. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात मेळघाट छत्तीसगड झारखंड येथे रावणाची मिरवणूक देखील काढून पूजा केली जाते. रावण आणि आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान आणि दैवत आहे परंतु आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या राजाला जाळण्याची प्रथा आणि परंपरा कायमस्वरूपी बंद करावी असे निवेदनात म्हटले आहे.