Nashik News : फुलांचा बाजार सजला, लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांचा दर वाढला, नाशिककरांची खरेदीसाठी गर्दी
Nashik News : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नाशिक (Nashik) शहरात फुलांचे भाव कडाडले असून झेंडूच्या फुलांचा शेकडा शंभर रुपये दर आहे.

नाशिक : आज लक्ष्मीपूजन (Lakshmipujan) असल्याने झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असून बाजारात मात्र फुलांचा भाव चांगलाच (Flower rate) वाढल्याचे चित्र आहे. आज झेंडूच्या फुलांचा दर 100 रुपये शेकडा आहे. तर झेंडू फुलांच्या कॅरेटचा दर 400 रुपये असून फुलांच्या माळा साधारण 60 रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत विक्री केल्या जात आहेत. त्यामुळे दसऱ्यापेक्षा दिवाळीत फुलांचे दर वाढल्याचे चित्र आहे.
दिवाळीच्या सणाला (Diwali) झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्व असते. दिवाळीत घर सजावटीसाठी, वाहनासाठी फुलाची खरेदी केली जाते. त्याचबरोबर आजच्या म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडूच्या फुलांचे दाराला तोरण लावले जाते. शिवाय, वाहन व दुकानांना फुलांची माळा घातल्या जातात. त्यामुळे दिवाळीच्या इतर खरेदीसह बाजार फुलांनी बहराला आहे. फुलांच्या खरेदीसाठी नाशिककर (Nashik) बाहेर पडले असून ग्राहकांच्या सोयीसाठी फुले विक्रेत्यांनी रस्त्या दुतर्फा व दुकाने थाटली आहेत. दसऱ्याच्या दिवशी फुलांचे दर घसरले होते. वीस ते तीस रुपयांना फुलांच्या माळा मिळत होत्या. मात्र दिवाळीत फुलांचे भाव वाढले असून झेंडूची फुले 100 शेकडा दराने विकली जात आहेत. तर फुलांच्या माळा 60 रुपयांपासून पुढे विकल्या जात आहेत.
दरम्यान ग्रामीण भागापेक्षा नाशिक शहरात झेंडूची फुले मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांनी आदल्या दिवशी फुले विक्री आणली होती. लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवार रात्री 12 वाजेपर्यंत रविवारी कारंजा परिसरात ग्राहक झेंडूची फुले पुष्पहार खरेदी करताना दिसून आले. सर्वाधिक मागणी झेंडू फुलांच्या माळांना असल्याने विक्रेत्यांनी फुलांच्या माळ्या मोठ्या प्रमाणावर तयार करुन ठेवल्या होत्या. पुष्पहार 60 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत विक्रेते जाते होते. दसऱ्याला झेंडूच्या फुलांचा भाव हा 50 ते 60 रुपयांदरम्यान होता. मात्र दिवाळीत भाव वाढल्याचे पाहायला मिळाले.
असे आहेत फुलांचे दर
दिवाळी आणि साडेतीन मुहूतांपैकी एक असलेल्या लक्ष्मीपूजनानिमित्त शनिवारी शहरात झेंडूच्या फुलांच्या आवकेत मोठी वाढ झाली. यानिमित्त गोदाघाटासह शहरातील विविध परिसरांत रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या झेंडूच्या फुलांच्या गाड्या रस्त्यांची शोभा वाढवत आहेत. मात्र दसऱ्याला 100 रुपये क्रेट असलेला दर लक्ष्मीपूजनलाही फारसा वाढल्याचे दिसून आले. साधारण झेंडूचा फुलांचा कॅरेटचा दर तीनशे रुपयांपासू पुढे आहे. शेवंती देखील दीडशे रुपयांपासून पुढे, शंभर रुपयांना डझन विकले जात आहे. फुलांच्या माळा साठ रुपयांपासून पुढे शंभर रुपयांपर्यत विक्री केली जात आहेत
इतर महत्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
