एक्स्प्लोर

कोरोना संकटातही संधीचं सोनं! नागपुरातील आयटी कंपनीत अमेरिकी कंपनीची 10 कोटी डॉलर्सची गुंतवणूक

नागपूरचे आयटी तज्ञ विक्रम लाभे यांच्या भारतीय स्टार्टअप आयटी कंपनी फाईव्हट्रनमध्ये लॉकडाउनच्या काळात तब्बल 10 कोटी डॉलर्स म्हणजेच 750 कोटींची परकीय गुंतवणूक आली आहे.अँडरसन हॉवर्डस नावाच्या मोठ्या अमेरिकी कंपनीने ही गुंतवणूक केली आहे.

नागपूर : कोरोना आणि त्यासोबत करण्यात आलेल्या अनेक महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. सध्या ढासळत्या अर्थव्यवस्थेची चर्चा होत असताना काही व्यवसाय मात्र कमालीचे भरभराटीला आले आहेत. नागपूरचे आयटी तज्ञ विक्रम लाभे यांच्या भारतीय स्टार्टअप आयटी कंपनी "फाईव्हट्रन"मध्ये लॉकडाउनच्या काळात तब्बल 10 कोटी डॉलर्स म्हणजेच 750 कोटींची परकीय गुंतवणूक आली आहे. अँडरसन हॉवर्डस नावाच्या मोठ्या अमेरिकी गुंतवणूक कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे अँडरसन हॉवर्डसने याच्या आधी फेसबुक, इंस्टाग्रामसह इतर अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक केली आहे.

मूळचे नागपूरकर आणि ग्रॅज्युएशन नंतर अनेक वर्षे कॅनडा आणि अमेरिकेत आयटी क्षेत्रात काम करणारे विक्रम लाभे सध्या बंगळुरूमध्ये आयटी क्षेत्रात काम करतात. भारतात आल्यानंतर त्यांनी फाईव्हट्रन नावाची स्टार्टअप आयटी कंपनी सुरु केली. या कंपनीने उभारणीच्या काही काळातच मोठी उंची गाठली आहे. फाईव्हट्रन प्रामुख्याने त्यांच्या ग्राहकांसाठी ऑटोमेटेड डेटा इंटिग्रेशनचे काम करते. एका प्रकारे क्लाइंट्सला लागणारा मोठ्या प्रमाणावरील डेटा गोळा करून ते हव्या त्या स्वरूपात वर्गीकृत करून देण्याचे देण्याचे काम फाईव्हट्रन करते. सध्या जागतिक पातळीवर विविध कंपन्या कोरोनामुळे कर्मचाऱ्यांनी घरातूनच काम करावे यावर भर देत आहे. त्यामुळेच ऑटोमेटेड डेटा इंटिग्रेशनचे काम करणाऱ्या फाईव्हट्रनसाठी कोरोना संकटकाळात ही नवी व्यावसायिक संधी निर्माण झाली आहे. क्लाइंट्सला लागणारा डेटा ऑनलाईन त्यांना उपलब्ध करून देण्याचे काम ते करत आहेत.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बनावट कागदपत्राद्वारे शासकीय नोकऱ्या लाटण्याचा प्रकार; PSI सह तिघांवर गुन्हा दाखल

राज्यातील तरुणांना रोजगारांच्या संधी विक्रम लाभे यांनी भारतीय तरुणांना सोबत घेऊन काही तरी करण्याचं ठरवलं होते. अमेरिकेतील आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांनी भारतात एका खोलीतून फाईव्हट्रन ही आयटी कंपनी सुरु केली. एका खोलीतून सुरु झालेली फाईव्हट्रन आज बंगळुरूमध्ये 1 हजार कर्मचाऱ्यांसह एका मोठ्या आयटी कंपनीपर्यंत पोहोचली आहे. बंगळुरू शिवाय हैदराबाद आणि मुंबईत कंपनीचे कार्यालय आहेत. लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम ही संकल्पना वाढीस लागल्याने फाईव्हट्रनला चांगले दिवस आले आहेत. अँडरसन हॉवर्डसच्या 10 कोटी डॉलर्स म्हणजेच 750 कोटींच्या गुंतवणुकीतून फाईव्हट्रन जागतिक पातळीवर पोहोचेल, असा विश्वास विक्रम लाभे यांनी व्यक्त केला आहे. सध्या विक्रम लाभे नागपुरात असून इथूनच कंपनीचे काम सांभाळत आहेत. विशेष म्हणजे आजवर त्यांनी फाईव्हट्रनमध्ये वैदर्भीय आणि महाराष्ट्रातील तरुणांना संधी दिली आहे. आता मोठ्या गुंतवणुकीनंतर कंपनीच्या विस्तारात पुन्हा वैदर्भीय आणि महाराष्ट्रातल्या आयटी अभियंत्यांना संधी देण्याचे त्यांनी ठरविले आहे.

Vidharbha Flood | केंद्रीय पथक आज पूरग्रस्त पूर्व विदर्भाची पाहणी करणार, आर्थिक मदत मिळणार?

महत्त्वाच्या बातम्या

AI च्या जगात वावरताना विवेकापर्यंत पोहचण्याची गरज, तुकाराम मुंढेंचा विद्यार्थ्यांना सल्ला
AI च्या जगात वावरताना विवेकापर्यंत पोहचण्याची गरज, तुकाराम मुंढेंचा विद्यार्थ्यांना सल्ला
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget