एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बनावट कागदपत्राद्वारे शासकीय नोकऱ्या लाटण्याचा प्रकार; PSI सह तिघांवर गुन्हा दाखल

Sports Certificate Scam : न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या पदक विजेत्याचं प्रमाणपत्र मिळवत शासकीय नोकऱ्या लाटण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी नागपुरात एक पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवून त्याद्वारे शासकीय नोकऱ्या लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नागपुरात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. संजय सावंत, पवन पाटील आणि निखिल माळी असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस खेळाडूंची नावे आहेत. राज्यात शेकडो बोगस खेळाडूंनी नोकऱ्या लाटल्याची माहिती समोर आली आहे. क्रीडा संचालनालय एकट्या नागपूर विभागात 21 प्रकरणाचा तपास करत आहे. 3 ते 5 लाखात बोगस प्रमाणपत्र दिले जात असल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक म्हणजे पवन पाटील आणि निखिल माळी यांनी ट्रेम्पोलिन या जिम्नॅस्टिक प्रकाराच्या खेळाचे प्रमाणपत्र मिळवत त्याआधारे नोकरी मिळविली होती. त्यांच्या प्रमाणपत्रामध्ये मुंबईत राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्याचे नमूद होते. मात्र, प्रत्यक्षात अशी कुठलीही राष्ट्रीय स्पर्धा मुंबईत झालीच नसल्याचे तपासात समोर आले आहे. तर संजय सावंत यानं पॉवर लिफ्टिंगचे बनावट प्रमाणपत्र बनवले होते आणि पोलीस विभागात पोलीस उपनिरीक्षक हे पद मिळविले होते. मात्र, ते प्रमाणपत्र ही खोटे निघाले आहे.

एकट्या नागपूर विभागात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे 21 बनावट प्रमाणपत्रधारक 

सध्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी न होता बनावट प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी बोगस खेळाडू लाटत असल्याच्या अनेक तक्रारी क्रीडा विभागात आल्या होत्या. त्यानंतर क्रीडा व युवक सेवा संचालनालयानं गंभीर दखल घेत तपास सुरू केले होते. मिळालेल्या माहितीनुसार एकट्या नागपूर विभागात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे 21 बनावट प्रमाणपत्रधारक शासकीय नोकऱ्या मिळवण्यात यशस्वी ठरल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत पाच टक्के आरक्षण आहे. त्यामुळं असे बनवाट प्रमाणपत्र तयार करून त्यांची लाखो रुपयांमध्ये विक्री करत होतकरू तरुणांच्या नोकऱ्या बनावट खेळाडूंच्या पदरात टाकण्यात मदत करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे.

कोरोना बाधितांचे मृतदेह प्लास्टिक बॅगसह निर्जंतुक करणं शक्य, नागपुरातील प्राध्यापकांचा दावा

राज्यभरात शेकडो नोकऱ्या कोट्यवधींच्या व्यवहारातून बोगस खेळाडूंना मिळवून देण्यात या रॅकेटने भूमिका बजावली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपुरात तीन बोगस प्रमाणपत्रांच्या प्रकरणातून या मोठ्या घोटाळ्याचा टोक समोर आला आहे. सध्या नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनचे पथक या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 01 December 2024Eknath Shinde Arrived Thane : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात परतलेTOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 01 December 2024Eknath Shinde On Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी Shrikant Shinde यांच्या नावाची चर्चा, शिंदेंच सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
Embed widget