उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात आरक्षण हवंय, राज्य सरकारकडे मागणी, मंत्र्यांकडून शिफारस करण्याचं आश्वासन
राज्यात मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, ओबीसी आरक्षणाचं घोंगडं भिजत असतानाच आता एका नव्या आरक्षणाची मागणी समोर आली आहे. आता महाराष्ट्रात उत्तर भारतीयांनी देखील आरक्षणाची मागणी केली आहे.

मुंबई : राज्यात मराठा आरक्षण (maratha reservation), मुस्लिम आरक्षण (muslim reservation), ओबीसी आरक्षणाचं (OBC Reservation) घोंगडं भिजत असतानाच आता एका नव्या आरक्षणाची मागणी समोर आली आहे. आता महाराष्ट्रात उत्तर भारतीयांनी देखील आरक्षणाची मागणी केली आहे. उत्तर भारतातील लोकांनाही महाराष्ट्रात नोकरी, शिक्षण आणि राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी नसीम खान यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्य सरकारकडे मागणी केली आहे.
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचे एकमत, प्राप्त सूचना, उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून शुक्रवारी पुन्हा बैठक : मुख्यमंत्री
उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पाल, विश्वकर्मा, मौर्य-कुशवाहा, कुर्मी-पटेल, यादव, राजभर, चौरसिया, प्रजापती, गुप्ता-तेली, शर्मा-नाई, सुवर्णकार-सोनार, लोधी या जातींसह विविध जातींचे लोक महाराष्ट्रात राहतात. या जातीतील लोकांना महाराष्ट्रात आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
OBC Reservation | ओबीसी आरक्षणाचा तिढा नेमका काय? राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका काय?
गुरुवारी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वात सगळ्या जातींच्या प्रतिनिधींनी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन ही मागणी केली. हे उत्तर भारतीय अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे निवासी आहोत, त्यामुळे इथे त्यांच्या मुलांचा जन्म झाला त्यांना इथल्या आरक्षणाचा लाभ द्यावा असा तर्क मांडण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील ओबीसी, एससी, एसटी, एनटीच्या यादीत उत्तर भारतातील वर दिलेल्या जातींचाही समावेश करावा अशी मागणी आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत आपण केंद्रीय मागासवर्ग आयोगाला पत्र लिहून शिफारस करु असं आश्वासन दिलं आहे.
Solapur : वेगळ आरक्षण घ्या पण OBC चं आरक्षण मागू नका, मराठा नेत्यांना Vijay Wadettiwar यांचा इशारा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
