Mumbai Local : मुंबई लोकलवरचा ताण हलका होणार, 12 मार्गिकांच्या अद्ययावतीकरणासाठी हजारो कोटींचा निधी मंजूर
Mumbai Local Upgradation : मुंबईत दररोज 3200 हून अधिक लोकल चालवल्या जात असल्या तरी लोकलवरचा ताण मात्र सातत्याने वाढताना दिसत आहे.
मुंबई : लोकल यंत्रणा अपग्रेड करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून एकाच वेळी बारा महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देत केंद्र सरकारने रेल्वे प्रशासनाला निधी दिला आहे. मुंबई लोकलच्या बारा प्रकल्पांचे काम एकत्रितरित्या सुरू होणार असून पुढच्या तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई लोकलवर असणारा ताण कमी होईल असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा आहे.
मुंबई लोकल हा मुंबईचा अविभाज्य भाग आहे. मात्र प्रत्येक दिवशी वाढणारी गर्दी आणि अपुरी पडणारी लोकल यंत्रणा यामुळे प्रवाशांचे मृत्यू आणि सतत होणारे बिघाड या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. दररोज 75 लाख प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात. त्यासाठी दरारोज 3,200 पेक्षा अधिक लोकल चालवण्यात येतात. पण या देखील अपुऱ्या पडत असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता देऊन निधी देखील मंजूर केला आहे.
अपग्रेड होणारे प्रकल्प कोणते?
1. सीएसएमटी ते कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका - 891 कोटी रुपये. यातील कुर्ला ते परेल हा पहिला टप्पा पुढील वर्षी पूर्ण होणार.
2. मुंबई सेंट्रल ते बोरिवली 6 वी मार्गिका - 919 कोटी 30 किमी, यातील खार ते गोरेगाव आधीच सुरू झाला आहे.
3. हार्बर मार्गाचे गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत विस्तारीकरण - 826 कोटी
4. बोरिवली ते विरार पाचवी आणि सहावी मार्गिका (26 किमी ) 2185 कोटी
5. विरार ते डहाणू तिसरी आणि चौथी मार्गिका (64 किमी ) 3587 कोटी
6. पनवेल ते कर्जत नवीन उपनगरीय कॉरिडॉर (29.6 किमी ) 2782 कोटी
7. ऐरोली ते कळवा उन्नत मार्गिका - 476 कोटी
8. कल्याण ते आसनगाव चौथी मार्गिका (32 किमी) 1759 कोटी
9. कल्याण ते बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका (14 किमी) 1510 कोटी
10. कल्याण ते कसारा तिसरी मार्गिका (67 किमी) 792 कोटी
11. नायगाव ते जुचंद्र (6 किमी ) 176 कोटी
12. निळजे ते कोपर दुहेरी कॉर्ड लाईन 338 कोटी
ही बातमी वाचा :