एक्स्प्लोर

Maharashtra Rain : मुंबई, ठाण्यासह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळणार; दोन दिवसांसाठी यलो अलर्ट

यंदा परतीच्या पावसानं (Rain) राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक  जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. गेल्या दहा वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

Maharashtra Rain: परतीच्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना चांगलेच झोडपून काढले आहे.  हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार (IMD), 17 आणि 18 ऑक्टोबरला म्हणजे आज आणि उद्या मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Maharashtra Rainfall) पडण्याची शक्यता आहे.  हवामान खात्याने सोमवरी आणि मंगळवारी मुंबईला यलो अलर्ट (Mumbai Yellow Alert)  दिला आहे. तसेच ठाणे (Thane), रायगड(Raigad) पालघरसह(Palghar) राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.  

ऑक्टोबर महिन्यात यंदा विक्रमी पावसाची नोंद 

यंदा परतीच्या पावसानं (Rain) राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक  जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. गेल्या दहा वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातून मान्सूनने रजा घेतली  आहे.

शनिवारी सकाळी मुंबई 216 मिमि पावसाची नोंद झाली. या अगोदर 1998 साली मुंबईत 376 मिमि म्हणजे आतापर्यंतच्या सर्वाधित पावसची नोंद झाली होती. सांताक्रुझ वेधशाळेने  दिलेल्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबरला 113 मिमि पावसाती नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक पाऊस आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून लवकरच महाराष्ट्रातून परतणार आहे.  मान्सून परतण्यापूर्वी सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसर बुधवारी हवामान कोरडे राहिल आणि गुरुवारी हलका पाऊस पडेल आणि त्यानंतर मान्सून निघून जाईल. सध्या सतत बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत.

अवघ्या बारा दिवसांतच राज्यातील 15 जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद

ऑक्टोबर महिन्यात गेल्या पाच वर्षांत यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अवघ्या बारा दिवसांतच राज्यातील 15 जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला असला तरीही तो राज्यातील उत्तर महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागातून निघाला आहे. मात्र, कोकण व मध्य महाराष्ट्रात मात्र त्याचा मुक्काम वाढल्याने ऑक्टोबरमध्ये विक्रमी पावसाची नोंद होत आहे. गेल्या बारा दिवसांत राज्यातील 15 जिल्ह्यांत अतिवृष्टी म्हणजे 60 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे, तर नऊ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसानं झालं आहे. काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस तसेच भाजीपाला पिकाचा समावेश आहे. दुसरीकडे शेतातील भात पीक झोपल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines 6.30AM 08 July 2024Mumbai Rain : मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, जागोजागी साचलं पाणीRadhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Embed widget