एक्स्प्लोर

Weather Update: मुंबईचा पारा वाढणार, हवेची गुणवत्ताही बिघडणार; सध्याच्या आठवड्यात कसं असेल हवामान? काय सांगतो IMDचा अंदाज

सध्याचा आठवडा मुंबईकरांसाठी उष्ण असणार आहे. तसेच, या आठवड्यात मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडणार आहे, असा अंदाज IMD नं वर्तवला आहे.

Mumbai Maharashtra Wether Update: दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात (South West Bay of Bengal) तयार झालेल्या 'मिचॉन्ग' (Cyclone Michaung) या चक्रीवादळानं दक्षिण भारतातील (South India) काही भागांत कहर करायला सुरुवात केली आहे. तामिळनाडूच्या (Tamil Nadu) अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस (Rain Updates) कोसळत आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या हवामानावरही (Maharashtra Wether Updates) परिणाम होत आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे मुंबई (Mumbai Wether Updats) आणि उपनगरांत पारा वाढण्याची (Mumbai Warm Weather) शक्यता आहे.

सध्याच्या आठवड्यात मुंबईत उष्ण हवामान राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या काळात दिवसाचं तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. येत्या काही दिवसांत वातावरणातील तापमानात निर्माण झालेल्या प्रणालीमुळे शहर आणि परिसरात अंशत: ढगांचं आच्छादन आणि धुकं राहील. परिणामी हवेची गुणवत्ताही ढासळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

सध्याच्या आठवड्यात तसं राहील मुंबईचं हवामान? 

गेल्या काही दिवसांत मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत (Mumbai AQI) थोडीशी सुधारणा झाली आहे. सोमवारी सकाळी मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी 'मध्यम' श्रेणीत राहिली. मात्र, सोमवारी शहरात हलकं धुकं होतं. आज कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकतं.

मुंबईच्या हवामान खात्याचे (IMD) संचालक सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत मुंबई आणि परिसरात हवामान कोरडं राहील. तर उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दिवसा तापमान किंचित उबदार असेल.

मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव कधी घेता येणार?  

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या उत्तरार्धात आणि जानेवारीच्या सुरुवातीच्या काळात मुंबईच्या तापमानात लक्षणीय घट पाहायला मिळेल. यावेळी मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येईल. गेल्या बुधवारी या मोसमात पहिल्यांदाच मुंबईचं किमान तापमान 20 अंशांच्या खाली गेलं होतं.

ढंगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांत तापमानात दोन-तीन अंशांनी वाढ होईल. राज्याच्या विविध भागांत तापमानही 15 अंशांच्या खाली गेलं आहे. IMD नं मंगळवार आणि बुधवारी विदर्भातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा जारी केला आहे.

चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळीचा कहर

मिचॉन्ग चक्रीवादळात (Cyclone Michaung) देशासह राज्यात आजही पावसाची हजेरी (Rain News) पाहायला मिळणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणावरही परिणाम झाल्याने अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांत राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या इतर भागात वातावरण कोरडं राहणार आहे, राज्यातील अनेक भागात अद्यापही थंडीची प्रतिक्षा आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Weather : चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळीचा कहर, शेतकरी संकटात; पावसाचा अंदाज, थंडीची प्रतिक्षा कायम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget