एक्स्प्लोर

Maharashtra Weather : चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळीचा कहर, शेतकरी संकटात; पावसाचा अंदाज, थंडीची प्रतिक्षा कायम

Maharashtra Rain Update : चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आज मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात थंडीची प्रतिक्षा मात्र कायम आहे.

Maharashtra Weather Update : मिचॉन्ग चक्रीवादळात (Cyclone Michaung) देशासह राज्यात आजही पावसाची हजेरी (Rain News) पाहायला मिळणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणावरही परिणाम झाल्याने अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांत राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या इतर भागात वातावरण कोरडं राहणार आहे, राज्यातील अनेक भागात अद्यापही थंडीची प्रतिक्षा आहे. 

राज्यात 'या' भागात पावसाची शक्यता

महाराष्ट्रात पुढील 24 तासांत विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. या भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, सोलापूर, उस्मानााद, अहमदनगर, लातूर भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

वर्ध्यात ढगाळ वतावरण; पावसाची शक्यता

वर्ध्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. आधीच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना पुन्हा ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातवरण कायम राहत असल्याने याचा फटका तूर पिकाला बसतो आहे. अवकाळी पावसात तुरीचा बहार गळाला होता. आता ढगाळ वातवरण आणि त्यात पावसाची शक्यता वर्तविली जात असल्याने पुन्हा शेतीपिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचं नुकसान 

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे मोठं संकट निर्माण झाले आहे. अवकाळी पावसामुळे आता द्राक्षाचे घड कुजू लागले आहेत. त्यामुळे हे द्राक्षे घड काढून टाकण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर आली आहे.  तासगाव तालुक्यातील खुजगाव येथील शेतकरी महेश पाटील या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेला अवकाळीचा फटका बसल्यामुळे द्राक्ष बागेतील द्राक्ष काढून ओढ्यात टाकावी लागत आहेत. तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शासनाने याची दखल घेऊन भरीव आर्थिक मदत करावी आणि द्राक्ष उत्पादकासाठी कर्जमाफी द्यावी अशी मागणी होत आहे. द्राक्ष घड फेकून देण्याची वेळ आल्याने यंदा द्राक्षाच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे.

थंडीची प्रतीक्षा कायम

डिसेंबर महिना उलटला तरी हवी तशी थंडी पडलेली नाही. आधी अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तर आता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशासह राज्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी मात्र, रडकुंडीला आला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 26 March 2025Special Report | Santosh Deshmukh | मास्टरमाईंड हत्येचा वाल्मिक कराडच! खटला ट्रॅकवर, न्याय लवकर?Special Report|Opposition Leader | संपला कालावधी निवड कधी? विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्तच राहणार?Special Report | Kunal Kamra | गाण्यावरुन वादंग, कामरावर हक्कभंग; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी सभागृहात गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
Embed widget