(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ATS Detained Maoist : झारखंड सरकारनं 15 लाखांचं बक्षीस ठेवलेल्या नक्षलवाद्याला नालासोपाऱ्यातून अटक
दहशतवाद विरोधी पथकानं आज पहाटे धानवी, रामनगर नालासोपारा (पुर्व), (पालघर) येथील एका चाळीवर छापा टाकला. यामध्ये कारु हुलाश यादव (45 वर्षे) या नक्षलवाद्याला ताब्यात घेतलं आहे.
Thane ATS Detained Maoist : ठाणे युनिटच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Anti Terrorism Squad) आज मोठी कारवाई केली आहे. या दहशतवाद विरोधी पथकानं आज पहाटे धानवी, रामनगर नालासोपारा (पुर्व), (पालघर) येथील एका चाळीवर छापा टाकला. यामध्ये कारु हुलाश यादव (45 वर्षे) या नक्षलवाद्याला ताब्यात घेतलं आहे. हा व्यक्ती मुळचा डोडगा, तालुका कटकमसांडी, जिल्हा हजारीबाग, झारखंड येथील रहिवाशी आहे. तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) या केंद्र सरकाने बंदी घातलेल्या संघटनेचा हजारीबाग येथील रिजनल कमिटीचा सदस्य आहे. दरम्यान यासंबंधीचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.
A team of Maharashtra ATS raided a Chawl in Dhanvi, Ramnagar, Nalasopara (E) and detained Karu Hulas Yadav, Regional Committee Member of the banned CPI (Maoist) in Jharkhand. He carries a reward of Rs 15 lakhs on his head & had come to Maharashtra for medical treatment: ATS
— ANI (@ANI) September 18, 2022
झारखंड सरकारनं ठेवलं होतं 15 लाखांचं बक्षीस
कारु हुलाश यादव हा नक्षलवादी सन 2004 पासून नक्षली कारवाईमध्ये सक्रिय असून, त्याच्यावर झारखंड सरकारनं 15 लाखांचे बक्षीस ठेवले आहे. आरोपी कारु हुलाश यादव हा औषधोपचाराकरीता नालासोपारा येथे आला असल्याची माहिती मिळाली आहे. या आरोपीताबाबत झारखंड पोलिसांना माहिती देण्यात आलेली असून, सदर आरोपीची अधिक चौकशी सुरु आहे.