एक्स्प्लोर

राज्यात प्रतिदिन चाचण्या 92 हजाराहून 75 हजारांवर, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना चाचण्या वाढीसाठी पुन्हा पत्र

भारतातील कोरोना रूग्णांच्या प्रमाणात महाराष्ट्रातील रूग्णांचे प्रमाण हे 22 टक्के आहे. असे असले तरी राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या चाचण्यांच्या तुलनेत मात्र महाराष्ट्र सातत्याने मागे आहे. महाराष्ट्रात, मुंबईत परिस्थिती लवकर पूर्वपदावर आणायची असेल, तर चाचण्यांवर भर द्यावा लागेल.

मुंबई : कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करा, असा सातत्याने आग्रह करीत असताना प्रत्यक्षात मात्र राज्यातील 92 हजार प्रतिदिन चाचण्यांचे प्रमाण आता 75 हजार चाचण्या प्रतिदिन असे झाले आहे. मुंबईत सुद्धा संसर्गाचे प्रमाण हे 2 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासंदर्भात आणखी एक पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, राज्यातील चाचण्यांची क्षमता दीड लाखांपर्यंत नेण्याचा मनोदय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात मात्र चाचण्यांच्या संख्येत सातत्याने घट केली जात आहे. यामुळे कदाचित रूग्णसंख्या कमी दाखविणे शक्य होईल. पण, कोरोना नियंत्रणात आणता येणार नाही आणि याचा फटका अर्थव्यवस्था खुली करण्याला बसेल. 1 ते 15 सप्टेंबर या पंधरवाड्यात 12,70,131 चाचण्या महाराष्ट्रात करण्यात आल्या. याची सरासरी 84,675 चाचण्या प्रतिदिन इतकी येते. 16 ते 30 सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात 13,76,145 चाचण्या करण्यात आल्या, याची सरासरी 91,743 चाचण्या प्रतिदिन इतकी येते. मात्र 1 ते 15 ऑक्टोबर या काळात केवळ 11,29,446 इतक्या चाचण्या करण्यात आल्या, याची सरासरी 75,296 चाचण्या प्रतिदिन इतकी येते. यामुळे चाचण्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

Corona Test | पाच मिनिटात कोरोना व्हायरस टेस्टचा रिपोर्ट देणारं किट विकसित, ऑक्सफोर्डच्या शास्त्रज्ञांचा दावा

मुंबईत सुद्धा पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असतानाही चाचण्यांकडे हवे तसे लक्ष दिले जात नाही. मुंबईत 1 ते 15 सप्टेंबर या पंधरवाड्यात 1,74,138 चाचण्या करण्यात आल्या, त्यातून 27,791 रूग्ण आढळून आले. संसर्गाचा दर हा 15.95 टक्के इतका होता. 16 ते 30 सप्टेंबर या काळात 1,79,757 चाचण्या करण्यात आल्या आणि त्यातून 31,672 रूग्ण आढळून आले. संसर्गाचा दर 17.61 टक्क्यांवर पोहोचला. 1 ते 15 ऑक्टोबर या पंधरवाड्यात 1,80,848 चाचण्यांमधून पुन्हा 31,453 रूग्ण आढळून आले. संसर्गाचा दर 17.39 टक्के इतका होता. याचाच अर्थ मुंबईतील संसर्गाचा दर सातत्याने वाढतो आहे. 1 ते 15 सप्टेंबर या काळात मुंबईत 572 मृत्यू नोंदवण्यात आले, ते 16 ते 30 सप्टेंबर या काळात 699 झाले आणि 1 ते 15 ऑक्टोबर या काळात 672 इतके होते. याचाच अर्थ मृत्यूच्या संख्येत सुद्धा वाढ झाली. जवळजवळ 2 टक्क्यांनी मुंबईतील संसर्गाचे प्रमाण वाढूनही चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करायला सरकार का तयार नाही, हा मोठाच प्रश्न आहे, असे फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.

चीनमध्ये कोरोनाच्या लसीकरणास सुरुवात, आतापर्यंत 5 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण

राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पाहिले तरी महाराष्ट्रातील लोकांचे मृत्यूचे प्रमाण अतिशय गंभीर आहे. देशात प्रतिदशलक्ष 97.6 मृत्यू असले तरी महाराष्ट्रात हेच प्रमाण 333 मृत्यू प्रतिदशलक्ष इतके आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा जवळजवळ 4 पट आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्येचे देशातील लोकसंख्येत प्रमाण हे 9 टक्के आहे. पण, देशातील एकूण कोरोनाबळीत महाराष्ट्राचे प्रमाण हे 41 टक्के आहे. भारतातील कोरोना रूग्णांच्या प्रमाणात महाराष्ट्रातील रूग्णांचे प्रमाण हे 22 टक्के आहे. असे असले तरी राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या चाचण्यांच्या तुलनेत मात्र महाराष्ट्र सातत्याने मागे आहे. महाराष्ट्रात, मुंबईत परिस्थिती लवकर पूर्वपदावर आणायची असेल, तर चाचण्यांवर भर द्यावा लागेल. कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने अर्थव्यवस्था खुली करण्यात अनेक समस्या येत आहेत. समाजातील प्रत्येक घटक आता प्रचंड आर्थिक अडचणीत असताना आता तरी चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget