एक्स्प्लोर

Shiv Sena, Dasara Melava 2022 : तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री? दसरा मेळाव्याच्या बॅनरवरील फोटोमुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या

Shiv Sena Dasara Melava 2022 : मेळाव्याचे ठाकरे गटाचे पोस्टर समोर आले आहेत. आणि या पोस्टरवर तेजस ठाकरेंचा फोटो दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Shiv Sena Dasara Melava 2022 : सध्या दसरा मेळाव्यावरुन शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गटात (CM Eknath Shinde) चढाओढ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा कुणाचा? यावरुन शिंदे गट आणि शिवसेना यांच्या प्रतिष्ठेची लढाई रंगली आहे. अशातच शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेकडून 'चलो शिवतीर्थ' म्हणत दसरा मेळाव्यासंदर्भात बॅनरबाजी सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या बॅनर्सवरुन एकीकडे दसरा मेळाव्यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. तर दुसरीकडे दसरा मेळाव्याचं औचित्य साधत ठाकरे कुटुंब आपला हुकमी एक्का बाहेर काढणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

दादरमधल्या शिवाजी पार्कवर कोण दसरा मेळावा घेणार हे अद्याप ठरलेलं नसलं तरीही आता शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्ये तेजस ठाकरेंचा फोटो दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचाही फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचा मुहुर्त साधत तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. 

दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे कुटुंब हुकमी एक्का काढणार?

शिवाजी पार्कच्या मैदानात दसरा मेळाव्यासाठी अद्याप पालिकेकडून कोणालाच परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच, शिवाजी पार्कचं मैदान दसरा मेळाव्यासाठी कोणालाही मिळणार नाही, अशी चर्चा सुरु झाल्या असून यासंदर्भातील महापालिकेचा विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय एबीपी माझाच्या हाती लागला आहे. अशातच शिवसेनेनं मात्र यासर्व घडामोडींवर आक्रमक पवित्रा घेत थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा घेण्याची तयारी दर्शवली आहे. तशी तयारीही शिवसेनेकडून सुरु झाल्याची चर्चा आहे. गद्दारांना क्षमा नाही...!, अशा आशयाचे बॅनर शिवसेनेकडून झळकवण्यात आले असून दसरा मेळाव्याच्या बॅनरवरील तेजस ठाकरेंच्या फोटोमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणं आलं आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे परिवार आपला हुकमी एक्का बाहेर काढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेकडून आरपारच्या लढाईची तयारी

शिवतीर्थावर नेमका कोणाचा दसरा मेळावा होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसताना आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेने  शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान नाकारल्यास शिवसेना कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेनं निर्णय घेण्यास उशीर लावल्यास आणि हे प्रकरण आणखी ताणल्यास शिवसेना थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा करण्याच्या तयारीत आहे. शिवतीर्थावर नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार? यावर मुंबई महापालिका निर्णय घेणार आहे. मात्र शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी फक्त आणि फक्त शिवतीर्थ हा एकमेव पर्याय आहे. इतर कुठल्याही मैदानाचा विचार शिवसेना करणार नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget