एक्स्प्लोर

शिर्डीतील घटना नशेखोरांचं काम, दुपारपर्यंत आरोपी अटकेत असतील, सुजय विखे पाटलांचा उशीरा आलेल्या अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

पहाटे चारच्या सुमारास घडलेल्या या खूनाच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणाव आहे. शिर्डीत हत्या झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या आक्रोशाने परिसर हादरला आहे.

Sujay Vikhe Patil ON Shirdi Murder: शिर्डीमध्ये पहाटे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण अहिल्यानगर हादरले आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा खून करण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यात दोन जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले असून तिसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही प्रकरणे प्लॅन केलेली हत्या नसून नशेच्या आहारी गेलेल्या गुन्हेगारांकडून झालेले 'रँडम मर्डर' असल्याचं खासदार सुजय विखे यांनी सांगितलं आहे. (Shiri Murder) दुपारपर्यंत

पहाटे चारच्या सुमारास घडलेल्या या खूनाच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणाव आहे. शिर्डीत हत्या झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या आक्रोशाने परिसर हादरला आहे. दरम्यान,  दुपारपर्यंत आरोपी अटकेत असतील. असं सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय. दरम्यान, उशीरा आलेल्या पोलिसांना जर अपघात आणि मर्डर यातला फरक कळत नसेल तर आता त्यांच्यावर कारवाई करू असंही ते म्हणालेत.  (Ahilyanagar crime)

हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

या घटनेबाबत पहाटे साडेपाच वाजता एका पोलिस अधिकाऱ्याला फोन केला असता, त्याने ही घटना अपघात असल्याचे सांगितले. यामुळे संतप्त होत “मर्डर आणि अपघातातील फरक कळत नसेल, तर अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले. सीसीटीव्ही फुटेज तपासून हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेज तपासून हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले.

शिर्डीत मोफत प्रसादालय बंद करण्याची मागणी

या घटनेनंतर सुजय विखे यांनी शिर्डीतील मोफत अन्नछत्र बंद करण्याची मागणी केली आहे. "आता अ‍ॅक्शन मोडमध्ये काम करावे लागेल. शिर्डीतील सर्वांनी एकत्र येऊन हा निर्णय घ्यावा. आम्ही हे अन्नछत्र बंद करून घेणारच," असे ते म्हणाले.शिर्डीमध्ये घडलेल्या या हत्याकांडामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तपास यंत्रणांना वेळ द्यावा, आरोपी दुपारपर्यंत पोलिसांच्या ताब्यात असतील” असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

नक्की घडले काय?

आंतरराष्ट्रीय देवस्थान असणाऱ्या शिर्डीमध्ये सोमवारी पहाटे तिघांवर चाकू हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली .एका तासाच्या अंतरात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करून दोघांची हत्या करण्यात आली .यात एक तरुण गंभीर जखमी आहे .शिर्डीतील साई संस्थानमध्ये दोघे कर्मचारी पहाटे ड्युटीला येत असताना ही घटना घडली .यातील सुभाष साहेबराव घोडे हे करडोबा नगर चौकाचे रहिवासी आहेत .नितीन कृष्णा शेजुळ यांच्यावर साकुरी शिव तर गंभीर जखमी असलेल्या कृष्णा देहरकर याच्यावर श्रीकृष्ण नगर भागात चाकू हल्ला झाला . अज्ञातांनी पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना केलेल्या चाकू हल्ल्यात दोन कर्मचारी जागीच मृत झाले तर कृष्णा देहरकर गंभीर जखमी आहेत . हत्येचे कारण अजून स्पष्ट नसून पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत .

संबंधित वृत्त:

Crime news: दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली, तासाभरात साई संस्थानच्या दोघांना चाकूनं भोसकत संपवलं, कुटुंबीयांचा आक्रोश

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Embed widget