ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 03 February 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 03 February 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, किताबासाठीच्या लढतीत पृथ्वीराजची सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर मात
महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट..मॅट विभागात निकाल मान्य नसल्याचं म्हणत शिवराज राक्षेची पंचांना लाथ..राक्षे आणि गायकवाड यांचं तीन वर्षांसाठी निलंबन
पराभूत शिवराज राक्षेनं लाथ मारल्याच्या निषेधार्थ पंचांचा ठिय्या, तर महेंद्र गायकवाडच्या समर्थकांनी गोंधळ घातल्यानं पोलिसांचा लाठीचार्ज...
राज्यातील सामाजिक योजना आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवी वॉररुम.. मंत्रालयात सोशल सेक्टर वॉररुमची पहिली बैठक
प्रयागराज महाकुंभमेळ्यात आज अमृतस्नानाचा योग, पाच कोटींपेक्षा जास्त भाविक अमृतस्नानासाठी जमण्याची शक्यता, हेलिकॉप्टरद्वारे गर्दीवर देखरेख, साधुमहंत प्रशासनावर समाधानी
कुंभमेळ्यातील मौनी अमावस्येच्या चेंगराचेंगरीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, यूपी सरकारकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवण्याची याचिकाकर्त्याची विनंती
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराची सांगता.. शेवटच्या दिवशी अमित शाहांच्या तीन सभा आणि भाजपाचे २२ रोड शो.. तर केजरीवाल घेणार दोन मेळावे.. प्रियंका गांधीही करणार प्रचार
महत्त्वाच्या बातम्या


















