ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 03 February 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 03 February 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स
दुहेरी हत्याकांडाने साईबाबांची हादरली शिर्डी, संस्थांनच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर प्राणघातक हल्ला, दोघांचा मृत्यू एक गंभीर, तासाभरातल्या तीन घटनांनी शिर्डीत खलबळ
राज्यातील सामाजिक योजना आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवी वॉररुम.. मंत्रालयात सोशल सेक्टर वॉररुमची पहिली बैठक
लवकरच एसटी महामंडळाची प्रीमियम बससेवा.. प्रवाशांना सुरक्षित आणि वक्तशीर सेवा देण्यासाठी सरकार आग्रही.. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कर्नाटक परिवहन सेवेची पाहणी
बीएमसीच्या बांधकाम परवानगी विभागातून तीन हजार फाईल्स गहाळ झाल्याची अखेर कॅग कडून दखल, पंधरा दिवसात चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश, वॉचडॉग फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यश
पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, किताबासाठीच्या लढतीत पृथ्वीराजची सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर मात
महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट..मॅट विभागात निकाल मान्य नसल्याचं म्हणत शिवराज राक्षेची पंचांना लाथ..राक्षे आणि गायकवाड यांचं तीन वर्षांसाठी निलंबन






















