एक्स्प्लोर

Rupee at 87 : अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा परिणाम रुपया निचांकी पातळीवर, डाॅलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 87 पार, शेअर बाजारात घसरण

Rupee Hit 87 Mark against Dollar : अमेरिकेतील सत्ता बदलाचे परिणाम आता दिसून येत आहेत. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर टॅरिफ लादले होते. त्यानंतर मेक्सिको आणि कॅनडानं देखील अमेरिकेवर टॅरिफ लादले.

मुंबई : अमेरिका आणि इतर देशांमध्ये सुरु झालेल्या व्यापारयुद्धाचा परिणाम इतर देशांवर व्हायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेनं कॅनडा आणि मेक्सिकोवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली. त्यानंतर कॅनडा अन् मेक्सिकोनं देखील अमेरिकेला जशास तसं उत्तर देत त्यांच्यावर देखील टॅरिफ लादलं. या व्यापार युद्धाचा परिणाम आशियामधील देशांच्या चलनावर दिसून आला. भारताच्या रुपयामध्ये देखील घसरण दिसून आली.  भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत 87 रुपयांवर पोहोचला.  कोरिया, मलेशिया इंडोनेशिया आणि थायलंड या देशांच्या चलनामध्ये देखील घसरण पाहायला मिळाली. 

डाॅलरच्या तुलनेत रुपयाने पहिल्यांदाच 87 पार केला आहे. मागील काही महिन्यात रुपयाची मोठ्या प्रमाणात पडझड सुरु आहे. आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांना  रुपया 87 रुपयांपर्यंत मार्च महिन्यापर्यंत घसरेल, असा अंदाज होता. मात्र, फेब्रुवारीच्या तिसऱ्याच दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपयानं  नीचांकी पातळी गाठली आहे. शुक्रवारी डाॅलरच्या तुलनेत रुपया 86.61 वर बंद झाला होता. मात्र, आज तब्बल 87 प्रति डाॅलरवर रुपया उघडत व्यवहार करतोय

रुपयाच्या घसरणीची कारणे?

अमेरिकेच्या सुधारित आर्थिक परिस्थितीत अमेरिकन डॉलरला मजबुती मिळाली आहे. भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत अमेरिकेतील उच्च उत्पन्नामुळे गुंतवणूकदारांसाठी अमेरिका आकर्षक ठरत आहे. नव्या अमेरिकन सरकारच्या धोरणांबाबत अनिश्चितता देखील रुपयाच्या घसरणीला कारणीभूत आहे.

सोबतच, जगातील भूराजकीय तणावांमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीतील अस्थिरता कायम, ज्यात रशिया-युक्रेन युद्ध, मध्य पूर्व संकट, लाल समुद्रातील शिपिंगसारख्या समस्यांमुळं देखील रुपया घसरला आहे.

रुपया घसरल्याचे परिणाम

परदेशी गुंतवणूकदारांकडून देखील भांडवली बाजारातून हात आखडता घेतला आहे. कमकुवत रुपयामुळे आयात बिलात वाढ, कारण आयातदार डॉलरमध्ये पैसे देतात. खाद्यतेल, डाळी, खते, तेल आणि गॅस यांच्या आयातीचा खर्च वाढतो.  भारताचे कच्च्या तेलावरील आयात अवलंबत्व जवळपास 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळं तेल आणि गॅसच्या आयातीवर मोठे परिणाम होणार आहेत. रुपया कमकुवत होणे म्हणजेच महाग आयात ज्याचे परिणाम देशातील महागाई वाढण्यास कारणीभूत ठरते.

शेअर बाजारात घसरण

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज शेअर बाजारातून कसा प्रतिसाद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, आज शेअर बाजार घसरणीसह खुला झाला.  निफ्टी 50, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. निफ्टी 50 हा  200 अंकांनी घसरुन ट्रेड करत आहे. बँक निफ्टी  377 अंकांनी घसरणीसह ट्रेड करत आहे. सेन्सेक्समध्ये देखील घसरण झाली असून 583 अंकांनी घसरुन ट्रेड करत आहे. 

इतर बातम्या :

IPO Update : पैसे तयार ठेवा, या आठवड्यात पाच आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Embed widget