Mumbai Crime : मुंबईतील वांद्रे टर्मिनसवरील रेल्वेमध्ये महिलेवर अत्याचार, सीसीटीव्हीतून आरोपीचा छडा लागला, आरपीएफकडून आरोपीला बेड्या
Mumbai Crime : मुंबईतील वांद्रे टर्मिनसमध्ये ट्रेनमधील एका कोचमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मुंबई : मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे एका ट्रेनमधील कोचमध्ये महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे. या घटनेमुळं महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 1 फेब्रुवारी शनिवार आणि रविवारच्या दरम्यान वांद्रे रेल्वे स्टेशनवर लांब पल्ल्याच्या एका रिकाम्या ट्रेनमध्ये 55 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी राहिल शेखला अटक केली आहे.
रेल्वे सुरक्षा बल आणि जीआरपीनं रविवारी सकाळी आरोपीला रेल्वे परिसरातून अटक केली. पोलिसांनी प्राथमिक माहिती देताना म्हटलं की आरोपीनं रिकाम्या ट्रेनमध्ये पीडित महिलेला कसं नेलं हा प्रश्न आहे. त्या ट्रेनमध्ये अत्याचार करण्यात आला. एका प्रवाशानं त्या महिलेच्या जावयाला माहिती तोपर्यंत आरोपीनं पलायन केलं होतं. त्यानंतर महिलेनं जीआरपीम्ये तक्रार केली. आरोपी रेल्वे स्टेशनवर असून हमाल असल्याचं सांगण्यात आलं. पोलिसांकडून या घटनाक्रमाची पडताळणी करण्यात येत आहे. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आरपीएफनं एका कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. कारण ज्या क्षेत्राची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती तिथं ही घटना घडल्याचं समोर आलं.
पोलिसांनी वांद्रे टर्मिनसच्या सीसीटीव्हीची पडताळणी केली. त्यानंतर आरोपी पुन्हा एकदा वांद्रे टर्मिनसमध्ये आला, पहाटे 5 वाजता त्याला रिकाम्या ट्रेनमधून ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी फुटपाथवर राहतो. आरोपीनं त्याचं नाव राहिल शेख आहे असं सांगितलं. मात्र, पोलिसांकडून तो देत असलेली माहिती खरी आहे का याची पडताळणी करत आहे.
घटना कशी घडली?
महिलेसोबत आलेला व्यक्ती काही कामानिमित्त बाहेर गेला होता. ट्रेनमधील इतर प्रवासी होते ते देखील तिथून निघून गेले. महिला पहिल्यांदा प्लॅटफॉर्मवर झोपली. त्यानंतर ती ट्रेनच्या रिकाम्या कोचमध्ये जाऊन झोपली. त्याचवेळी तिथं असलेल्या हमालानं याचा फायदा घेतला अन् डब्यात प्रवेश करत तिच्यावर अत्याचार केला.
उत्तर भारतातील हरिद्वार येथून महिला जावयासोबत मुंबईमध्ये पर्यटनासाठी आली होते. मुंबईत एका परिचित व्यक्तीनं त्यांना मुंबईत फिरवलं, मात्र रात्रीच्या मुक्कामाची सोय होऊ न शकल्यानं महिला आणि तिचा जावई वांद्रे टर्मिनसवर झोपला होता. ते प्लॅटफॉर्म क्रमांक 6/7 वर गेले होते. त्या परिसरात इतर कोणी नव्हतं. त्याच ठिकाणी महिलेवर अत्याचार झाला.
इतर बातम्या :























