एक्स्प्लोर
भाजप खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देणार?
भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. ख्रिश्चन धर्मीयांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर, पक्षश्रेष्ठींनी गोपाळ शेट्टी यांना झापल्याची चर्चा आहे.

मुंबई: भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. ख्रिश्चन धर्मीयांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर, पक्षश्रेष्ठींनी गोपाळ शेट्टी यांना झापल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर गोपाळ शेट्टी यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.
मला कोणत्याही पदापेक्षा वाणी स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आणि प्रिय आहे. पक्षाने सांगण्याअगोदर मी दुपारी एक वाजेपर्यंत निर्णय जाहीर करेन. पक्षाने कारवाई करण्याची वाट पाहणार नाही, असं गोपाळ शेट्टी म्हणाले.
पदापेक्षा वाणीस्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं आहे. वाणीस्वातंत्र्यावर गदा आणणारं पद मला नको. त्यामुळे मी आज एक वाजता निर्णय घेणार आहे, असं गोपाळ शेट्टी यांनी सांगितलं.
वक्तव्यावर ठाम
दरम्यान, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. काँग्रेसच्या लोकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. माझ्या 26 वर्षांच्या कारकिर्दीत मी कधीही भेदभाव केला नाही.
माझ्या वक्तव्याने पक्षाचा किंवा पक्षातील लोकांना त्रास होऊ नये, म्हणून मी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी मी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे गेलो. मात्र त्यांनी राजीनाम्याची घाई न करण्यास सांगितलं, असं गोपाळ शेट्टी म्हणाले.
गोपाळ शेट्टी यांचं ख्रिश्चनांबाबतचं वक्तव्य काय?
भाजप खासदार गोपाळ शेट्टी एका वादग्रस्त विधानामुळं चर्चेत आले आहेत. भारतातील ख्रिश्चन हे मूळ ब्रिटीश होते, त्यामुळं त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नव्हता असं वक्तव्य खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलं आहे. याबाबतचा त्यांचा व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मुंबईच्या मालवणीत शिया कब्रस्तान कमिटीमार्फत आयोजित एका कार्यक्रमात शेट्टी बोलत होते.
यावेळी त्यांनी भारतातील हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र लढले. दोन्ही समुदायांनी मिळून भारत स्वतंत्र केला. स्वातंत्र्य लढ्यात कोणी हिंदू-मुस्लिम म्हणून नव्हे तर हिंदुस्थानी म्हणून लढले, असं सांगतानाच त्यांनी दोन्ही समुदायावर स्तुतीसुमनं उधळली.
दरम्यान दोन व्यक्तींनी खासदार शेट्टी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
गोपाळ शेट्टी नेमकं काय म्हणाले?
आज हर एक व्यक्ती को लगना चाहिए की ये देश हमारा है | आपका है, हमारा है, हम सब का देश है
मौलवी साब ने बताया, ये देश को हिंदूओने आजाद नहीं किया है, ये देश को कोई मुसलमानोने आजाद नहीं किया है,
ख्रिश्चन लोग तो ऑलरेडी थे, तो वो लडाई में थे ही नहीं
ये दोनो (हिंदू-मुस्लिम) समाज थे, तब हमने आजादीके लिए हिंदुस्तानी करके लडा था| हिंदू और मुसलमान करके लडे नहीं है|
हमें मिलके देश को आगे लें जाना पडेगा क्योंकी हमारे देश के प्रधानमंत्रीजी का नारा है, सबका साथ, सबका
विकास..वो यहीं है|
में जो भी करुंगा देशवासियों के लिए करुंगा
हिंदू के लिए करुंगा, मुसलमान के लिए करुंगा ये नहीं
कोई भी खडा होकर बोल सकता है, की मोदी साबने मुसलमानो के लिए ये खराब किया और हिंदुओ के लिए ये अच्छा किया?
कोण आहेत गोपाळ शेट्टी?
गोपाळ शेट्टी हे भाजपचे मुंबई उत्तर या मतदारसंघाचे खासदार आहेत.
2014 मधील लोकसभा निवडणुकीत ते महाराष्ट्रात सर्वाधिक मताने निवडून आले होते
गोपाळ शेट्टींनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा तब्बल 4 लाख 56 हजार मतांनी पराभव केला होता.
गोपाळ शेट्टींना त्यावेळी 6 लाख 64 हजार 4 मतं मिळाली होती, तर निरुपम यांना केवळ 2 लाख 17 हजार 422 मतं होती.
गोपाळ शेट्टी 1991 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते, त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला.
बोरिवली परिसरात नगरसेवक ते आमदार म्हणून भरघोस काम केलं. मोकळ्या जागेत झोपडपट्ट्या उभ्या राहू न देता, तिथे मैदानं आणि उद्यानं तयार केली.
पोयसर जिमखाना ते राणी लक्ष्मीबाई उद्यानापर्यंत अनेक उद्यानं आणि मैदानं विकसित केली.
त्यामुळेच त्यांना बोरिवलीकरांनी ‘उद्यान सम्राट’ उपाधी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
