अति घाई, संकटात नेई! नियंत्रण सुटल्यानं दुचाकी आदळली, दोन तरुण उड्डाणपुलावरुन थेट खाली, भिवंडीतील घटना
Bhiwandi Accident : अति वेगानं दुचाकी चालवणं तरुणांना चांगलंच महागात पडलंय. नियंत्रण सुटल्यानं दुचाकी दुभाजकाला आदळली आणि तरुण थेट उड्डाण पुलावरुन खाली पडले.

Bhiwandi Accident : भिवंडीत (Bhiwandi) झालेल्या धक्कादायक अपघाताची सध्या चर्चा सगळीकडे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भिवंडी शहरातील कल्याण नाका परिसरात राजीव गांधी उड्डाण पुलावर हा अपघात झाला. अतिशय वेगात दुचाकी येऊन उड्डाण पुलाच्या दुभाजकाला आदळली. दुचाकीवरील दोन तरुण थेट पुलावरुन खाली रस्त्यावर पडले. या अपघातात दोघंही गंभीर जखमी झाले असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भिवंडी शहरातील कल्याण नाका परिसरातील राजीव गांधी उडान पुलावरून दोन तरुण दुचाकीवरुन चालले होते. अतिशय वेगात ते दुचाकी चालवत होते. वेग वाढला आणि गाडीवरील नियंत्रण सुटलं. दुचाकीस्वार अनियंत्रित होऊन उड्डान पुलाच्या दुभाजकाला आदळला आणि थेट दुचाकी स्वार आणि त्याच्या मागे बसलेला तरुण हवेत उडून उड्डान पुलावरून खाली पडले. मात्र यावेळी त्यातील दुचाकी उड्डान पुलावरच राहिली, तर दोघही तरुण थेट उड्डान पुलाच्या खाली पेट्रोल पंपासमोर पडले, स्थानिकांनी तात्काळ या युवकांना ॲम्बुलन्स बोलवून शासकीय रुग्णालयात दाखल केलं. दोघेही तरुण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एका तरुणाची परिस्थिती गंभीर असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी ठाण्यात हलवण्यात आलं आहे. तर दुसऱ्या तरुणावर भिवंडीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
स्वर्गीय बालासाहेब ठाकरे उड्डान पूल राजीव गांधी उड्डान पुलाला जोडला गेला आहे. यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या उड्डान पुलावरून आपल्या ड्यूक बाईकनं अतिशय वेगात जात होते. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं वळण घेण्याऐवजी थेट राजीव गांधी उड्डानपुलाच्या समोरील दुभाजकाला आदळली. त्यामुळे दुचाकी उड्डान पुलावरच राहिली. परंतु दुचाकीवर असलेले दोन्ही तरुण हवेत उडत थेट पुलावरुन खाली पेट्रोल पंपासमोर पडले. यामध्ये हे दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून स्थानिकांनी तात्काळ त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Wardha : समुद्रपूर वाघ शिकार प्रकरणात चार दात आणि 17 नखं जप्त, आरोपी अटकेत
- Aurangabad Crime: युट्यूबरने प्रेयसीला संपवल्यानंतरचा 'सीसीटीव्ही' व्हिडिओ आला समोर, पहा कशाप्रकारे...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
