Bhiwandi Crime : भिवंडीत नऊ बांगलादेशी महिलांना अटक, चाळ मालकाविरोधातही गुन्हा दाखल
Bhiwandi Crime : भिवंडीत नऊ बांगलादेशी महिलांना अटक, चाळ मालकाविरोधातही गुन्हा दाखल

Bhiwandi Crime : मागील काही महिन्यात पोलीस प्रशासनाने बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम गांभीर्याने सुरू केली आहे. मागील दोन महिन्यात भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यक्षेत्रात तीसहून अधिक बांगलादेशी नागरिकांची धरपकड केल्यानंतर शहरानजीकच्या ठाकुरपाडा येथे भिवंडी गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत नऊ बांगलादेशी महिलांची धरपकड केली आहे. त्यासोबत त्यांना आसरा देणाऱ्या चाळ मालका विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नऊ महिला कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय भारताच्या सीमेत घुसखोरी करून भिवंडीत वास्तव्य करीत असल्याचे आढळून आले.यासर्व महिला ठाकूर पाडा येथील ज्या चाळीत राहत होते त्या चाळीचे मालक दिपक गंगाराम ठाकरे अशा एकूण दहा जणांविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
कोनगाव पोलिस ठाणे हद्दीतील ठाकूर पाडा येथील नविन मराठी शाळेच्या पाठीमागे आलेल्या दिपक गंगाराम ठाकरे यांच्या चाळीत काही बांगलादेशी नागरीक स्वतःची ओळख लपवून वास्तव्य करीत असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी कारवाई करीत
Santosh Deshmukh Family : संतोष देशमुखांचे कुटुंब भगवान गडावर जाणार, नामदेव शास्त्रींकडे पुराव्यांची फाईल सादर करणारhttps://t.co/P2N2sXGWB5
— ABP माझा (@abpmajhatv) January 31, 2025
भिवंडीत बांगलादेशी नागरिकांची धरपकड
सिमा बेगम सिराज बेग,वय 27 वर्षे,
रेखा अनिसराम राम,
रूपा अनिसराम राम उर्फ सती इक्बाल इक्चाल हुसैन अक्तर,वय 24 वर्षे,
अंजनी हबीज शा वय 23 वर्षे,
शारदा बन्सी साहू,वय 42 वर्षे,
ममता शारदा साहू,वय 26,
पायल राजु साहू,वय 28 वर्षे,
पिंकी शारदा साहू,वय 45 वर्षे,
काजल शांत्रवन्सी साहू वय 20 वर्षे
या नऊ महिला कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय भारताच्या सीमेत घुसखोरी करून भिवंडीत वास्तव्य करीत असल्याचे आढळून आले.यासर्व महिला ठाकूर पाडा येथील ज्या चाळीत राहत होते त्या चाळीचे मालक दिपक गंगाराम ठाकरे अशा एकूण दहा जणांविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूरhttps://t.co/b75lyE7cpc
— ABP माझा (@abpmajhatv) January 31, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
