एक्स्प्लोर
मुंबई-पुण्यातही 'पाणी'बाणी! पाणी जपून वापरण्याचं आवाहन
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये अवघा 88 हजार 743 दशलक्ष लिटर म्हणजेच 6.13 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

फोटो : गेट्टी इमेज
मुंबई : मुंबईकर आणि पुणेकरांच्या घशाला कोरड पाडणारी बातमी समोर आली आहे. मुंबईसोबतच पुण्यालाही पाणीपुरवाठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे दोन्ही शहरातील नागरिकांना जपून पाणी वापरावं लागणार आहे. राज्यात मान्सून लांबल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये अवघा 88 हजार 743 दशलक्ष लिटर म्हणजेच 6.13 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 2018 मध्ये आजच्या दिवशी पाणीसाठा 2 लाख 15 हजार 157 दशलक्ष लिटर म्हणजे 14.87 टक्के होता.
आता पालिकेने राखीव पाणीसाठा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हा पाणीसाठी पुरेल, असा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. मुंबई आणि परिसरात पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई पालिकेने केलं आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील एकूण पाणीसाठा
अप्पर वैतरणा--0
मोडक सागर-- 48 हजार 471 दशलक्ष लिटर
तानसा-- 6 हजार 188 दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा-- 24 हजार 295 दशलक्ष लिटर
भातसा-- 6 हजार 437 दशलक्ष लिटर
विहार --1 हजार 354 दशलक्ष लिटर
तुलसी--1 हजार 998 दशलक्ष लिटर
पुण्यातही पाणीबाणी
जूनचा दुसरा आठवडा उलटल्यानंतरही पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणाची पाणी पातळी खालावलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.18 टक्के पाणीसाठा कमी आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये केवळ 9. 68 टक्के म्हणजेच 2.82 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
गेल्या वर्षी याच दरम्यान या चार धरणांमध्ये 10.86 टक्के म्हणजेच 3. 16 टीएमसी एवढा पाणीसाठा होता. धरण क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यास पुण्यात पाणीटंचाईचं संकट निर्माण होईल.
पुण्यातील धरणांमधील पाणीसाठा
खडकवासला
25.95 टक्के
पानशेत
14.40 टक्के
वरसगाव
6.00 टक्के
टेमघर
0 टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
