एक्स्प्लोर
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
Paytm Share : आज पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. साधारपणे पेटीएमचा शेअर 2025 मध्ये 15 टक्के घसरला आहे, त्यामुळं कंपनीचं बाजारमूल्य घटलंय.

पेटीएमचा शेअर गडगडला
1/5

पेटीएम म्हणजेच वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण झाली. पेटीएमचे शेअर काल 848.95 रुपयांवर होते. आज ते 773.90 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळं बीएसईवर पेटीएमचं बाजारमूल्य सध्या 52749 कोटींवर पोहोचलं आहे. पेटीएमचा शेअर वर्षभरात 10 टक्क्यांनी वाढला मात्र 2025 मध्ये 15 टक्क्यांनी घसरला आहे.
2/5

अंदाजे 2200 चिनी व्यक्तींच्या क्रिप्टो करन्सी घोटाळा प्रकरणी एकूण 8 पेमेंट गेटवेमधील 500 कोटींची रक्कम ईडीनं चौकशीनंतर गोठवली आहे.
3/5

10 चिनी व्यक्तींकडून 2200 कोटी रुपयांचा घोटाळा देशातील 20 राज्यांमध्ये करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे त्यामुळं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यातील 500 कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत.
4/5

ईडीनं रेझरपे, पेयू , इस बझ, पेटीएम, एग्री पे, स्पीड पे, वुंडर बेकड या पेमेंट गेटवेच्या खात्यातील एकूण मिळून 497 कोटी रुपयांची रक्कम गोठवली होती. पेटीएमकडील 2.8 कोटींची रक्कम गोठवल्याची माहिती आहे.
5/5

पेटीएमनं या संदर्भात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे खुलासा केला आहे. त्यामध्ये ईडीकडून माध्यमात प्रकाशित झालेल्या वृत्ता संदर्भात नोटीस मिळालेली नसल्याचं म्हटलं. आमचं ईडीच्या चौकशीसंदर्भातील 2 सप्टेंबर 2022 चं पत्र विचारात घ्याव. आम्ही तपास यंत्रणांना पूर्णपणे चौकशी करणार असल्याचं पेटीएमनं म्हटलं. आमच्या कंपनीवर ईडीनं कारवाई केलेली नाही. कारवाई त्रयस्थ मर्चंटसवर केल्याचं पेटीएमनं म्हटलं. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 24 Jan 2025 01:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion