एक्स्प्लोर

ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा

MSRTC Fare Hike : एसटीची भाडेवाढ करण्यात आल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 15 टक्के भाडेवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी आणि रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीसंदर्भात माहिती दिली. प्राधिकरणाची बैठक मंत्रालयात पार पडल्याची माहिती मला मिळाली आहे.   त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश नसतो. गृह खात्याचे प्रधान सचिव, परिवहन खात्याचे प्रधान सचिव, अर्थ खात्याचे सचिव या तिघांच्या समितीच्या अंतर्गत ती एक बैठक आयोजित केले जाते. कालच्या बैठकीत निर्णय झाला आहे की एसटीची भाडेवाढ 14.97  टक्क्यांनी झाली आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 3 रुपयांनी झाली आहे. दिवसेंदिवस डिझेल, सीएनजीचे दर वाढत आहेत, त्यामुळं प्रत्येक वर्षी भाडेवाढ अपेक्षित असते. गेल्या तीन ते चार वर्ष भाडेवाढ झालेली नसल्यानं एकत्रितपणे  14.97 टक्के भाडेवाढ आजपासून लागू होईल, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. 

सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे हे मान्य आहे, ती वस्तूस्थिती आहे. एसटी महामंडळाची स्थिती काही चांगली नाही. परिवहन खात्याचा चार्ज घेऊन एक महिना होत आला आहे. एसटीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. एसटीला दिवसाला तीन कोटी रुपयांचं नुकसान होत असल्यानं भाडेवाढ अपरिहार्य आहे. प्रवाशांना चांगली सेवा द्यायची असेल तर या गोष्टीची भविष्यात गरज असणार आहे. डिझेलचे दर वाढत आहेत, मेंटनन्सचा खर्च अधिक येतो. एसटीकडे 14300 स्वत:च्या बसेस आहेत. त्यावर 87 हजार कर्मचारी काम करत आहेत.  गेल्या तीन चार वर्षांपासून भाडेवाढ करण्यात आलेली नव्हती. त्यावेळी भाडेवाढ करण्यात आलेली आहे. एकत्रितपणे भाडेवाढ करण्यापूर्वी दरवर्षी भाडेवाढ केली तर प्रवाशांना भुर्दंड पडणार नाही, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. 

लालपरीचं भविष्य अधांतरी होतंय, हे वाटत असताना, दररोज तीन कोटी रुपयांचं नुकसान होतंय ते दरवाढीमुळं कुठेतरी कमी होईल, असं प्रताप सरनाईक म्हणाले. 

लाडक्या बहिणींना 50 टक्क्यांची सवलत दिल्यानं एसटीचं उत्पन्न वाढलंय. प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. 75 वर्षांवरील वृद्ध लोक आहेत त्यांना शासनानं मदत करणं आवश्यक आहे. एसटी महामंडळाच्या तोट्याचा आणि या योजनांचा काही समावेश नाही, असं प्रताप सरनाईक म्हणाले. 

इलेक्ट्रिकच्या 5 हजार बसेसची ऑर्डर दिलेल्या आहेत. साडे चारशे ते पाचशे बसेस एसटीच्या ताफ्यात आलेलं आहे. एसटीचं उत्पन्न फार कमी आहे. 2025 पर्यंत त्या बसेस मिळणं अपेक्षित होतं, पण चारशे ते पाचशे बसेस आलेल्या आहेत. बॅटरी आणि चार्जिंग स्टेशनचा प्रश्न आहे. भविष्यात पूर्णत: इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा प्रयत्न असेल, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

इतर बातम्या : 

मोठी बातमी : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची 'एबीपी माझा'ला माहिती!

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
Pune Navale Bridge Accident: मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 8 जणांचा मृत्यू 20 जखमी
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 8 जणांचा मृत्यू 20 जखमी
Finance: जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
Embed widget