
Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 08 ऑगस्ट 2022 : सोमवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. आजपासून केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटातील लढाई, पक्षचिन्ह धनुष्यबाणावर दोन्ही गटांचा दावा
2. नीती आयोगाच्या बैठकीनंतरच्या फोटोत शिंदेंना शेवटच्या रांगेत स्थान, शिवाजी महाराजांना औरंगजेबानं दिलेल्या वागणुकीची राष्ट्रवादीकडून आठवण
3. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात, गृहमंत्रीपद फडणवीसांकडे राहण्याची शक्यता, विस्तारावरुन टीका करणाऱ्यांना शिंदे-फडणवीसांचं उत्तर
4. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना दुसऱ्यांदा सुनावलेल्या ईडी कोठडीचा अखेरचा दिवस, आज पुन्हा कोर्टात हजेरी
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांना जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान न्यायलयाने संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावली होती. राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली होती. दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडी (ED) कोठडी आज संपणार आहे. आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळणार की तुरुंगातच राहावे लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
5. रायगड, रत्नागिरी पुणे साताऱ्याला रेड, मुंबई ठाणे आणि पालघर कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट, राज्यभर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं संपूर्ण राज्यभरात धुमशान घातलं आहे. हवामान विभागानं (India Meteorological Department, IMD) पुढच्या 5 दिवसांसाठी देशातील विविध राज्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानं (IMD) म्हटलं आहे की, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश (Flood) परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासोबतच हवामान खात्यानं नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 08 ऑगस्ट 2022 : सोमवार
6. यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचं सावट, गणेशोत्सवाची खरेदी 20 ते 25 टक्क्यांनी महाग, पुजेचं सामान, बाप्पाचे दागिने महागले
7.'लोकमान्य टिळकांचं रत्नागिरीतील जन्मस्थळ काल्पनिक', शरद पोंक्षेंचा दावा; जन्मस्थळावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
8. पुण्यात पाळीव कुत्रा अंगावर आल्यानंतर तरुणीची पोलिसांच धाव, पोपटाच्या शिटीमुळे मालकावर गुन्हा
9. मोदी सरकारच्या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सलग चौथ्यांदा दांडी, तर सोनिया गांधींशी खलबतं केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
10. बर्मिंगहॅम राष्ट्रकुलमध्ये 18 सुवर्ण पदकांसह भारत पाचव्या स्थानावर, भारतीय बॉक्सरचा गोल्डन पंच, टी-20त भारतीय महिला संघाला रौप्य पदक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
