एक्स्प्लोर

ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...

Manikrao Kokate on Shiv Sena UBT : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय.

Manikrao Kokate on Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) आत्मविश्वास बळावलेल्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस समोर येत आहे. नुकताच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय. यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. आता यावरून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय. 

संजय राऊत यांनी आज नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आमची ताकद आजमावायचीच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी याबाबत संकेत दिले आहेत. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे लागतात, अशी घोषणा त्यांनी केली. 

नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?

संजय राऊत यांच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय. त्यांनी म्हटलंय की,  तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काय करावे? कुणासोबत लढावे? कुणासोबत लढावे? उघडे लढावे की कपडे घालून लढावे,तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जे योग्य वाटते आहे त्यांनी ते करावे, असे माणिकराव कोकाटे म्हणाले. 

चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा : जितेंद्र आव्हाड 

संजय राऊत यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. ठाकरे गटाचा निर्णय झाला असेल तर थांबवणारे आम्ही कोण? राऊतांनी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी संजय राऊत यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर दिली आहे. 

आणखी वाचा 

ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर

Sharad Pawar: पवार काका-पुतणे एकाच व्यासपीठावर दिसणार! अनेक मंत्री, विविध राजकीय पक्षाचे नेते जमणार एकाच व्यासपीठावर, दोन्ही पवारांकडे राज्याचं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, माणिकराव कोकाटेंचा जोरदार टोला; म्हणाले, त्यांनी उघडं लढावं कपडे घालून लढावं, तो त्यांचा...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, माणिकराव कोकाटेंचा जोरदार टोला; म्हणाले, त्यांनी उघडं लढावं कपडे घालून लढावं, तो त्यांचा...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणाTorres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, माणिकराव कोकाटेंचा जोरदार टोला; म्हणाले, त्यांनी उघडं लढावं कपडे घालून लढावं, तो त्यांचा...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, माणिकराव कोकाटेंचा जोरदार टोला; म्हणाले, त्यांनी उघडं लढावं कपडे घालून लढावं, तो त्यांचा...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Embed widget