एक्स्प्लोर

संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  

विधानसभेला तिन्ही पक्षाला जनतेने नाकारलं होतं. ते आता निवडणुका स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू त्याची आम्हाला चिंता नसल्याचे वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं.

Radhakrishna Vikhe Patil : विधानसभेला या तिन्ही पक्षाला जनतेने नाकारलं आहे. ते आता निवडणुका स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू त्याची आम्हाला चिंता नसल्याचे वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. राज्यामध्ये जो विजय आम्हाला विधानसभेला मिळाला तोच विजय आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. आगामी महापालिका निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. यावर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते शिर्डीत बोलत होते. 

शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. अधिवेशन स्थळाचा आज राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपला महाविजय मिळवायचा आहे. या निवडणुकांच्या दृष्टीने रणशिंग फुंकल जाणार असल्याचे विखे म्हणाले. 

भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तिन्ही पक्षांनी सत्ता स्थापन केली होती

मी मागेच म्हणालो होतो महाविकास आघाडीची बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही. महाविकास आघाडीचे लोक भूमिका आणि तत्व यासाठी एकत्र आलेले नाहीत. महाविकास आघाडीची सत्तेत येण्याची धडपड होती असा टोला विखे पाटलांनी लगावला. कोणी हिंदुत्व सोडलं, कोणी आपल्या विचारधारेला बाजूला ठेवल्याचे विखे पाटील म्हणाले. सत्ता गेल्याबरोबर महाविकास आघाडीतील मतभेद समोर यायला सुरुवात झाल्याचे ते म्हणाले. काँग्रेस उबाठाबद्दल बोलतंय उबाठा राष्ट्रवादी बद्दल चर्चा करतय, असे म्हणत विखे पाटलांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तिन्ही पक्षांनी सत्तेच्या लालसापाई सत्ता स्थापन केली होती. निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करून त्यांनी विजय संपादन केला होता. मात्र, ते नेरेटिव्ह विधानसभेला चाललं नाही असंही विखे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणारे घरी बसलेत, काँग्रेस पक्षाची दुरावस्था मी सांगण्याचं कारण नाही असेह विखे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत महाविकास आघाडी राहील अशी स्थिती नाही असंही ते म्हणाले.

संजय राऊत यांचं संतुलन बिघडलंय

संजय राऊत यांना फक्त मुद्दा पाहिजे असतो. त्यांनी स्वतःचं अस्तित्व गमावलं आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना चुकीची माहिती दिली त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही विखे पाटील म्हणाले. संजय राऊत यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. राऊत यांचं संतुलन बिघडल्याचे विखे म्हणाले. आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार का? याबाबत देखील विचारण्यात आलं. यावेळी विखे पाटील म्हणाले, तो अधिकार माझा नाही. महायुतीमध्ये सोबत असणारे सगळ्या घटक पक्षाचे प्रमुख नेते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते याबाबत निर्णय करतील असे विखे पाटील म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत कांग्रेसची होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणाTorres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत कांग्रेसची होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली, किती जणांनी अर्ज भरले, आकडेवारी समोर
सिडकोकडून तीन वेळा मुदतवाढ , 26000 घरांसाठी किती अर्ज आले? किमती जाहीर होताच अनेकांनी निर्णय फिरवला
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
Embed widget