एक्स्प्लोर

रायगडमध्ये 50 टन टाकाऊ प्लास्टिक कचऱ्यापासून 40 किमी लांबीचा रस्ता

प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक आहे. त्याचा फटका मनुष्यासह प्राण्यांनाही बसतो. टाकाऊ प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी, रायगडमध्ये 40 किलोमीटर रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

रायगड : प्लास्टिकचा कचरा हा जगासाठी चिंतेच विषय बनला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये प्लास्टिक बंदीही करण्यात आली आहे. प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. असाच एक प्रयोग रायगड जिल्ह्यात करण्यात आला आहे. रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीने रायगडमधल्या नागोठाण्यात 50 टन प्लास्टिक कचऱ्यापासून 40 किमी लांबीचा रस्ता बनवला आहे. रस्ता बनवण्यासाठी दुधाच्या पिशव्या, चॉकलेट, वेफर्सचे रॅपर आणि इतर खराब प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे हा रस्ता तयार होताना प्रत्येक किमी मागे एक लाख रुपयांची बचत झाली आहे. दर पावसाळ्यात राज्यात रस्त्यांची दुर्दशा होते. ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पाहायला मिळतात. या खड्ड्यांमुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. मात्र पावसातही या रस्त्याचं नुकसान होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यात या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. हा रस्ता नेमका कसा बनला? - रस्त्यात बिटूमेन आणि दगडांचे तुकडे एकत्र केले जातात - यात 7 टक्के प्लास्टिक आणि 93 टक्के बिटूमेन मिक्स केलं जातं - एक किलोमीटर रोडसाठी एक टन प्लास्टिकचा वापर होतो - रायगडच्या रोडमध्ये 50 टन प्लास्टिकचा वापर - काँक्रिटच्या रस्त्यांच्या तुलनेत 40 लाख रुपयांची बचत होते. हे प्लास्टिक वापरात कसं आणतात ? - खाऊच्या पदार्थांपासून रस्ता - दुधाच्या पिशव्या, बिस्किट, चॉकलेट रॅपर आणि इतर वस्तूंचा प्लास्टिक कचरा साफ केला जातो - तो मशीनमध्ये बारीक केला जातो. - त्यानंतर गरम भट्टीमध्ये बिटूमेन, दगड आणि इतर वस्तूंबरोबर प्लास्टिक एकत्र केलं जातं. - प्लास्टिकचे दाणे डांबरी रस्ता तयार करताना खडी आणि डांबरासोबत उच्च तापमानात वितळवण्यात येतात - यात अस्फाल्ट काँक्रिटचा थर तयार होतो, ज्याचा वेअरिंग कोट म्हणून रस्त्यावर वापर होतो. अशाप्रकारे प्लास्टिकयुक्त डांबरी रस्ते तयार केले जातात. या प्लास्टिकयुत्त डांबरीकरणामुळे रस्त्यांची लवचिकता वाढते आणि रस्त्याला तडा जात नाही आणि भेगा पडत नाहीत. तसंच वरच्या थरामध्ये प्लास्टिकचा वापर केल्याने रस्त्यावर पडणारे पाणी रस्त्यात झिरपत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Vijay Wadettiwar & Yogesh Kadam : महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
Imtiaz Jaleel Majha Vision : औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Embed widget