Santosh Deshmukh Case: उज्ज्वल निकम म्हणाले, केस ओपन करा, वाल्मिक कराडचा वकील म्हणाला, तुमच्या म्हणण्यानुसार होणार नाही!
कोर्टात नक्की झालं काय? वाचा..

Beed: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याची आज पहिली सुनावणी होती. यात सरकारी वकील उज्वल निकम यांनी वाल्मिक कराड (Walmik Karad)आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबरला बैठका झाल्याचा महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर मांडला. दरम्यान विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यात 3 वेळा फोन झाल्याची माहिती सीडीआरमधून समोर आली असल्याचेही उज्वल निकमांनी (Ujwal Nikam) सांगितलं. वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टासमोर डिस्चार्ज एप्लीकेशन ठेवले आहे. वाल्मिक कराड वर जे गुन्हे लावले आहेत ते आम्हाला मान्य नसल्याचेही वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. दरम्यान, उज्वल निकम यांनी या प्रकरणातील सांगितलेल्या सर्व घटना,सीडीआर आणि लोकेशन बाबतचे पुरावे वारंवार सांगितले आहेत .परंतु त्यातील कोणतेही पुरावे आम्हाला मिळालेले नाहीत.उज्वल निकम यांनी कागदपत्र देऊन केस पुढे घेऊन जाऊ शकतो असे मत मांडले . त्यावर आरोपीचे वकील विकास खाडे यांनी . केवळ आपण म्हणता म्हणून केस ओपन झाली असे होत नाही. असे म्हणत सर्व इलेक्ट्रॉनिक पुरावे मिळण्याबाबत अर्ज केला. व कागदपत्रांवर अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणीही वाल्मीक कराडचे वकील विकास खाडे (Vikas Khade)यांनी न्यायालयासमोर केली . यावर कोर्टाने पुढील सुनावणीची तारीख 10 एप्रिल दिली आहे .
वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद काय ?
वाल्मिक कराड वर जे गुन्हे लावण्यात आले आहेत ते आम्हाला मान्य नसल्याचे वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले आहे .दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे डिस्चार्ज एप्लीकेशनही न्यायालयासमोर ठेवण्यात आले आहे .उज्वल निकम यांनी या प्रकरणातील सांगितलेल्या सर्व घटना,सीडीआर आणि लोकेशन बाबतचे पुरावे वारंवार सांगितले आहेत .परंतु त्यातील कोणतेही पुरावे आम्हाला मिळालेले नाहीत .हे पुरावे मिळावे यासाठी आम्ही मागील तारखेला अर्ज केलेला आहे असेही वकील विकास खाडे यांनी न्यायालयाला सांगितले .सरकारी वकिलांनी सादर केलेल्या सर्व पुरावे आणि कागदपत्र मिळाल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येणार नाही त्याशिवाय चार्जर प्रेम करता येणार नाही .त्यामुळे आजही पुरावांसाठी अर्ज केला असल्याचं ते म्हणाले .
या मागणीवर कोर्टाने सर्व कागदपत्रे आणि पुरावे आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश दिले .यावर सरकारी वकील उज्वल निकम यांनी कागदपत्र देऊन केस पुढे घेऊन जाऊ शकतो असे मत मांडले . त्यावर आरोपीचे वकील विकास खाडे यांनी . केवळ आपण म्हणता म्हणून केस ओपन झाली असे होत नाही म्हणत गोपाळकृष्ण केस चा संदर्भ दिला. एका तासात मागणी केलेली सर्व कागदपत्रे दिले जातील असे आश्वासनही उज्वल निकम यांनी दिले . यावर कागदपत्र मिळाल्यानंतर त्यावर अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी वाल्मीक कराड यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर केली .न्यायालयाने ही मागणी मान्य केली व पुढील सुनावणीची तारीख 10 एप्रिल दिली आहे .साक्षीदारांचे जबाब,आरोपींचे जबाब, व्हिडिओ, सी डी आर मधील डिटेल, कोणतेही इलेक्ट्रॉनिक पुरावे देण्यात आले नव्हते . असे वाल्मीक कराडचे वकील विकास खाडे यांनी सांगितले .
हेही वाचा:






















