
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune crime : साडीचा नाद भोवला! साडीचं आमिष दाखवून दोन वृद्ध महिलांंची लाखोंची फसवणूक
पुण्यातील दोन वृद्ध महिलांना साडीचा नाद चांगलाच महागात पडल्याचं समोर आलं आहे. आमच्या शेठला मुलगा झाला आहे. त्यामुळे ते साड्या वाटणार आहे, असं सांगत दोन वृद्ध महिलांची फसणवूक केल्याचा प्रकार घडला आहे.

Pune Crime : पुण्यातील दोन वृद्ध महिलांना साडीचा नाद चांगलाच महागात पडल्याचं समोर आलं आहे. आमच्या शेठला मुलगा झाला आहे. त्यामुळे ते साडी आणि पैसे वाटणार आहे, असं सांगत दोन वृद्ध महिलांची फसणवूक केल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यात (Pune Crime) एकाच परिसरात नाही तर अनेक परिसरातून अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहे. पाषाण, वडगाव बुद्रुक या परिसरातील महिलांची सव्वा दोन लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या सगळ्या घटनेचा पुणे पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 79 वर्षीय वृद्ध महिला मेडिकलमध्ये गोळ्या आणण्यासाठी जात होत्या. त्यावेळी एका मुलाने त्यांचा काही दूर पाठलाग केला. त्यानंतर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. आमच्या शेठला मुलगा झाला आहे. त्यामुळे ते प्रचंड आनंदी झाले आहेत. त्यांनी महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे. तुम्हीही त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आमच्यासोबत एका ठिकाणी चला, असं त्या वद्ध महिलेला सांगण्यात आलंं. त्यांना एका ठिकाणी नेलं आणि त्यांच्या गळ्यातील 25 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण लाल कापडात काढून ठेवण्यास सांगितलं. त्याप्रमाणे महिलेने गंठण काढून दिलं. गंठण काढून दिल्यावर त्या मुलाने गंठण लंपास केलं. त्यानंतर वृद्ध महिलेला आपली फसवणूक झाल्याचं कळताच महिलेने चतु: शृंगी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर तक्रार दाखल केली.
वडगाव बुद्रुकमध्येही 85 वर्षीय महिलेसोबत असाच प्रकार घडला आहे. त्यांच्या घरापासून बस स्टॉपवर जात असताना त्यांच्याबरोबर हा प्रकार घडला आहे. त्यांनाही मुलगा झाल्याचं सांगण्यात आलं. त्यांचे सोन्याचे दागिने लाल कपड्यात ठेवायला सांगितले. हे दागिने किमान 1 लाख 89 हजार रुपये किमतीचे होते. त्यांना बंद पाकीट देण्यात आलं. त्यात पैसे असल्याचं सांगितलं. मात्र घरी गेल्यावर त्यांनी पाकीट उघडल्यावर त्यात बिस्किटाचे तुकडे आढळले. त्यांनी देखील यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
गुन्ह्यांसाठी वृद्ध टार्गेटवर
या भुरट्या चोरांनीच नाही तर सायबर चोरांनी देखील वृद्धांना टार्गेट केल्याचं काही घटनांमधून सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका 64 वर्षीय महिलेला लग्नाचे स्वप्न पाहणे चांगलेच महागात पडलं होतं. या महिलेसोबत एकाने सोशल मीडियावर मैत्री केली होती. त्यानंतर लग्नाचं अमिष दाखवलं आणि वेगवेगळ्या कारणाने तिच्याकडून तब्बल 57 लाख 79 हजार रुपये उकळले होते. त्यामुळे वृद्धांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
