एक्स्प्लोर

Mantralay : मंत्रालयातील प्रशासकीय कारभार का सुस्तावला?

Mantralay : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोडता राज्यात कुठल्याच विभागाला मंत्री नसल्याने मंत्रालयात अभ्यंगतांची वर्दळ कमी आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी सर्वाधिक वेळ मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेत, राज्याचा कारभार करायला सुरुवात केली. मात्र याला जवळपास महिना होत आला, तरी  मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) तिढा कायम आहे. त्यात राज्याचा गाडा ज्या मंत्रालयात हाकला जातो, तेथील प्रशासकिय कारभार सुस्तावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सध्या मंत्रालयात (Mantralay) सर्वत्र ही परिस्थिती 

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोडता राज्यात कुठल्याच विभागाला मंत्री नसल्याने मंत्रालयात अभ्यंगतांची वर्दळ कमी आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी सर्वाधिक वेळ मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर काही कर्मचारी काम सोडून गप्पा गोष्टी करण्यात व्यस्त असल्याचे दृश्य मंत्रालयात सर्वत्र पहायला मिळते. मंत्री नाहीत, तोपर्यंत येऊ नका असे काही कर्मचारी व अधिकारी कामानिमित्त येणाऱ्या अभ्यंगतांना सांगतात असे काही कामानिमित्त आलेले लोकं सांगतात.


Mantralay : मंत्रालयातील प्रशासकीय कारभार का सुस्तावला?

मोबाईल वापराबाबत राज्य शासनाच्या सूचना पण...

आताच्या काळात सुलभ आणि वेगवान संपर्क माध्यम म्हणून प्रशासकीय कामात मोबाईलचा वापर अपरिहार्य बनला आहे. मोबाईलच्या वापराबाबत काही संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नियम पाळले  जात नाही असे  अभ्यंगत सांगतात.  परिणामी शासनाची प्रतिमा काही प्रमाणात मलिन होते. शासकीय कामकाज करताना मोबाईल वापराबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 23 जुलै 2021 रोजी सूचना दिले आहे. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे याचे परिणाम प्रशासकिय कामकाजावर होत आहेत.

मंत्रालयात येणारे लोकं संतप्त

मंत्रालयात राज्यभरातून अनेक सर्वसामान्य लोक आपली अनेक कामे घेऊन येत आहेत. मात्र ती काम मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्यामुळे करण्यास कर्मचारी व अधिकारी नकार देत आहेत. तसेच काही कर्मचारी हे मोबाईलवर व्यस्त असतात त्यामुळे त्यांना खूप वेळ  उभे राहून त्यांना विनंती करावी लागते त्यामुळे आता आम्हाला वाली कोण? हा प्रश्न आम्हाला पडलाय असे मुरबाडहून आलेले हरिश्चंद्र जाधव सांगतात.

कर्मचारी व अधिकारी द्विधा मनस्थितीत

यावर अनौपचारिक बोलताना अधिकारी व कर्मचारी म्हणतात की,मंत्रीच नसतील तर कसे निर्णय घ्यायचे. आज निर्णय घेतले आणि उद्या नव्याने येणाऱ्या मंत्र्यांना ते मान्य नसतील, तर काय करायचं. सध्याची स्थिती तात्काळ निर्णय किंवा काम करण्यासारखी नाही. अनेक प्रकरणावर स्थगिती मिळत आहे, त्यामुळे आम्ही काय करायचं आम्हाला प्रश्न आहे असे  मंत्रालयातील अनेक कर्मचारी व अधिकारी सांगतात.

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Hingoli FDA Action: हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget