Maharashtra Politics : अस्लम शेख यांनी 300 कोटींचा घोटाळा केला, सोमय्यांचा आरोप
Maharashtra Politics : महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजपा नेता तत्कालीन महाविकास अघाडी (MVA) सरकारच्या कथित घोटाळ्याविरोधात (Big Scam) आक्रामक झाले आहेत.

Maharashtra Politics : महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजपा नेता तत्कालीन महाविकास अघाडी (MVA) सरकारच्या कथित घोटाळ्याविरोधात (Big Scam) आक्रामक झाले आहेत. भाजपा नेता किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी मलाड पश्चिमचे (Malad West) आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केलाय. अस्लम शेख यांनी मलाड येथील मढ येथे समुद्रात उभारलेला स्टुडिओ नियमांत बसत नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.
अस्लम शेख यांचा एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे, त्यापैकी 300 कोटींची कागदपत्र देत आहे. अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे, असे पाच स्टुडीओ आहेत, ज्यात CRZ नियमांच उल्लघन केलं आहे. रविवारी गोपाळ शेट्टी यांच्या सोबत पाहणी केली, कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवली आहे. आदित्य ठाकरे यांनी पण इथे भेट दिली होती. ज्या जागेवर 2019 साली काही नव्हतं तिथं 2021 ला स्टुडिओ उभारला आहे. अस्लम शेख आणि भाटिया स्टुडिओ यांचे मालक भागीदार असल्याचं सांगितलं जातं आहे, असे सोमय्या यांनी सांगितलं.
मंग्रो तोडून स्टुडिओ उभारले आहेत. याला पर्यावरण विभागाने सहा महिन्यासाठी फिल्म सेट उभारणी साठी परवनगी दिली होती. पण अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ उभारले आहेत. आदित्य ठाकरे यांनी याला भेट दिली त्याचे फोटो आहेत ते आम्ही योग्य वेळी दाखवू. या प्रकरणात कोस्टल झोन ऑथेरीटी यांना पत्र लिहिलं आहे. यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मला अपेक्षा आहे की यावर कारवाई होईल, असेही सोमय्या म्हणाले.
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांची वसईत निकॉन इन्फ्रा कार्यालयाला भेट
संजय राउत यांनी सहा महिन्यापूर्वी पञकार परिषदेत किरीट सोमय्या यांचे पुञ नील सोमय्या यांच्या वर गंभीर आरोप केले होते. पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमांइडशी किरीट सोमय्या यांचे संबंध असून, त्यांचे पुञ नील हा या मास्टरमाईंडच्या कंपनीत संचालक पदावर काम करत असल्याचा आरोप करत, त्यांनी निक़ॉन फेज १ आणि २ असे हजारो कोटीचे प्रकल्प वसईत उभे केले आहेत. हा सगळा पीएमसी बॅंकेतील पैसा आहे. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या मिळालेल्या नसून, राष्ट्रीय हरित लवादाने अँक्शन घेतल्यास कारवाई होईल असा इशारा राऊत यांनी दिला होता. किरीट सोमय्या यांनी वसईतील निकॉन इन्फ्रा या कार्यालयाला भेट दिली होती. तेथे सुमारे एक ते दीड तास चर्चा केली. त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या माड या कार्यालयाला ही भेट दिली होती. तेथे ही जवळपास एक तास राजीव पाटील, बांधकाम व्यावसायिक अनिल गुप्ता, देवेन ठक्कर यांच्या शी चर्चा केली गेली. बंद दारा आड चर्चा झाल्यामुळे नेमकं काय झालं हे कळू शकलं नाही. तर पञकारांनी किरीट सोमय्यांना विचारण्याचा प्रयत्न केला माञ त्यांनीही पञकारांशी संवाद साधणं टाळलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
