Maharashtra Political Crisis LIVE: राज्यातील शिंदे सरकार बचावलं; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं
Maharashtra Political Crisis Live Updates: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात फैसला अवघ्या काही तासांत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा फैसला होणार, निकाल एकमतानं येण्याची शक्यता
LIVE
Background
Maharashtra Political Crisis Live Updates: 21 जून 2022... ही तीच तारीख आहे, ज्यादिवशी महाराष्ट्रात थरारक आणि अभूतपूर्व सत्तासंघर्ष सुरू झाला. 10 महिन्यांनंतर या सत्तासंघर्षाचा महानिकाल आज लागणारेय. महत्त्वाचं म्हणजे, हा निकाल एकमताने दिला जाण्याची आणि फक्त सरन्यायाधीश निकालाचं वाचन करण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा निकाल येण्याचीही शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे, शिवसेनेसह ठाकरे गटाची धाकधूक वाढलीय. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत. प्रचंड धक्कादायकरित्या घडलेल्या या सत्तानाट्याने महाराष्ट्राचा राजकीय पटच बदलून टाकला. उद्धव ठाकरेंना चेकमेट करून शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र आता कोर्ट शिंदेंसोबत गेलेल्या 16 आमदारांना पात्र ठरवणार की अपात्र? शिंदेंनी मांडलेला सत्तेचा डाव विस्कटणार की अभय मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणारेत. तीन पक्षांची मोट बांधून निर्माण झालेल्या महाविकास आघाडीसह, शिंदेंना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झालेल्या भाजपचेही डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत.
राज्यातील सत्तासंघर्षावर जवळपास अकरा महिन्यानंतर आज निकाल लागणार आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला डाव सावरणार की विस्कटणार हे आज स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत. घटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायद्यासंबंधी हा निकाल येणार आहे. 1973 सालच्या केशवानंद भारती खटल्याप्रमाणे आजचा निकाल हा एक लँडमार्क जजमेंट असण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी सूरत ते गुवाहाटी आणि तेथून गोवामार्गे महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर संपूर्ण भारतात आजही चर्चेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल यांची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर 20 जून 2022 रोजी जे नाट्य रंगलं, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या (Shivsena) फुटीपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. त्यावेळी बंडखोरी केलेल्या 16 आमदारांना अपात्र करण्याची नोटिस त्यावेळचे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी दिली होती. पण त्याआधीच त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं.
घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर 14 फेब्रुवारी ते 16 मार्च अशी सलग सुनावणी झाली आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. ज्या घटनापीठाला हा निकाल द्यायचा आहे त्या घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा. दिल्ली केंद्र सरकारचं प्रकरण महाराष्ट्रातील प्रकरणाच्या आधीच पूर्ण झालं आहे. 17 जानेवारीपासून हाही निकाल प्रलंबित आहे.
shivsena symbol supreme court hearing live updates maharashtra political crisis uddhav thackeray vs eknath shinde shiv Sena bjp Maharashtra news marathi news
Maharashtra Politics : अजूनही 16 आमदारांच्या निर्णयावर सरकारचे भवितव्य, निकालानंतर नरहरी झिरवाळ असं का म्हणाले?
Maharashtra Politics : सद्यस्थितीत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे 16 आमदारांचा निर्णय अद्याप येणे बाकी आहे, त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचे भवितव्य त्यावर अवलंबून असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) म्हणाले आहे.
Uddhav Thackeray: शिंदे गटाच्या आम्हीच शिवसेना दाव्यावर 'सर्वोच्च' ताशेरे;पक्ष आणि चिन्हावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Uddhav Thackeray: गेल्या 11 महिन्यांपासून अंधांतरी असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेवेळी केलेल्या प्रत्येक कृतीवर ताशेरे ओढले आहेत. फुटलेला गट बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा दावा करु शकत नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या आम्हीच शिवसेना यावरून सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात शिंदे गटाला फटकारले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे.
CM Eknath Shinde : घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने कालबाह्य केलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Maharashtra Political Crisis : आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल होता, अखेर सत्याचा विजय झाला अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आमचं सरकार घटनाबाह्य आहे असं म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने आज कालबाह्य केलं आहे असंही ते म्हणाले.
Maharashtra Political Crisis: 'राजीनामा नसता दिला तर...'; सर्वोच्च न्यायालयाच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले...
Uddhav Thackeray On Supreme Court Verdict: आज सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) निर्णय दिला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं एका मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. सर्वोच्च न्यायालयानं शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर ताशेरे ओढले, पण तरीही शिंदे सरकार स्थिर राहिलं त्यासाठी कारण ठरलं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा राजीनामा. उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिली नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मी राजीनामा दिला नसता तर मी परत मुख्यमंत्री झालो असतो, पण ही लढाई माझ्यासाठी नाहीये, जनतेसाठी आहे, लोकशाहीसाठी आहे, असं म्हटलं आहे.
आता काही शंका नाही ना कोणाला? काहीजण पराभवाचे फटाके फोडतायत; शिंदेंचा ठाकरे गटाला टोला
#MaharashtraPoliticalCrisis आता काही शंका नाही ना कोणाला? काहीजण पराभवाचे फटाके फोडतायत; शिंदेंचा ठाकरे गटाला टोला #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray https://t.co/wo06V7OAFq pic.twitter.com/7UL8Ka3ANh
— ABP माझा (@abpmajhatv) May 11, 2023