Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाणार? भवितव्याचा आज फैसला
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या भवितव्याचा आज फैसला
दोन वर्षांच्या शिक्षेला कोकाटे सत्र न्यायालयात आव्हान देणार
आव्हान याचिकेवर दुपारी तीननंतर सुनावणी होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळणार की आमदारकी जाणार? याकडे लक्ष
खोटे कागदपत्रे देऊन शासनाच्या सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे दोषी
फसवणूकप्रकरणी कोकाटेंना ५० हजारांचा दंड आणि दोन वर्षांची शिक्षा
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसंदर्भातील निकालाची प्रत आज विधिमंडळ सचिवालयाला मिळण्याची शक्यता आहे. कांग्रेस नेते सुनिल केदार यांच्यासंदर्भात दोनच दिवसात विधिमंडळ सचिवायलाकडून जागा रिक्तची अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, मंत्री माणिकराव कोकाटेंसंदर्भात अद्यापही निकालाची प्रत मिळाली नसल्याचा दावा विधिमंडळ सचिवालयाकडून करण्यात आलाय.. त्यामुळे आज विधिमंडळ सचिवालयाला निकालाची प्रत मिळण्याची शक्यता आहे. कोकाटेंवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केलीये..मात्र कोर्टाकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत प्रत माझ्याकडे आलेली नाही प्रत प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आता निर्णय घेतला जाईल असं आश्वासन राहुल नार्वेकरांनी दिलंय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
