Jalgaon : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल! सोशल मीडियावर चर्चेचा विषय
Jalgaon News : व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे गुलाबराव वाघ मात्र चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये?

Jalgaon News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ (Gulabrao Wagh Video Viral) यांचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या चांगलाच व्हायरल होतोय. यामुळे सोशल मीडीयावर चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे गुलाबराव वाघ मात्र चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्याचं चित्र दिसत आहे. नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये?
'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड व्हायरल
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गुलाबराव वाघ कार्यकर्त्यांसोबत नृत्य करताना दिसत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव मध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. जल्लोष साजरा करताना कार्यकर्त्यांकडून गुलाबराव वाघ यांच्यावर पैसे उडवले गेले. पैसे उडवल्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड व्हायरल झाला. गुलाबराव वाघ यांचा 2 नोव्हेंबर म्हणजेच काल वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातच हा पैसे उधळल्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. मात्र गुलाबराव वाघ यांनी या आरोपाचं खंडन केल आहे. तीन वर्षांपूर्वी शिवजयंतीच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांकडून हा प्रकार घडल्याचा गुलाबराव वाघ यांनी सांगितलं आहे.
गुलाबराव वाघ वादाच्या भोवऱ्यात सापडले
व्हिडीओमध्ये गुलाबराव वाघ यांना खांद्यावर घेत काही कार्यकर्ते नृत्य करताना दिसून येत आहे. तर याच दरम्यान कार्यकर्ते गुलाबराव वाघ यांच्यावर नोटा उधळून टाकत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. जरी हा व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत असले तरी, त्या वेळी गुलाबराव वाघ हे मंत्री गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक होते. एखाद्या राजकीय पुढाऱ्यांने अशा पद्धतीने कृत्य करणे कितपत योग्य आहे, असाही सवाल आता उपस्थित होत आहे. एकीकडे शिवसेना नेत्यांनी पक्ष बांधणीसाठी जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे, मात्र अशातच एका जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून पैशांची उधळपट्टी केली जात आहे. तर दुसरीकडे व्हिडीओमुळे गुलाबराव वाघ हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Andheri East By Election : '166-अंधेरी पूर्व'साठी आज मतदान, किती उमेदवार अन् किती मतदार, काय-काय सुविधा - पोटनिवडणुकीबाबत सर्वकाही
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
