India Vs New Zealand : Rohit Sharma चा भारतीय संघ मोठ्या रुबाबात उपांत्य फेरीत
India Vs New Zealand : Rohit Sharma चा भारतीय संघ मोठ्या रुबाबात उपांत्य फेरीत
भारतानं न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव करून, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात अव्वल स्थान राखलं. त्यामुळं उपांत्य फेरीत भारताचा सामना मंगळवारी ऑस्ट्रेलियाशी होईल. भारत-न्यूझीलंड संघांमधल्या सामन्यात गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताला नऊ बाद २४९ धावांत रोखलं होतं. त्यामुळं न्यूझीलंडसमोर विजयासाठी २५० धावांचं माफक आव्हान होतं. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंडचा अख्खा डाव २०५ धावांत गुंडाळला. लेग स्पिनर वरुण चक्रवर्ती भारताच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं ४२ धावांत न्यूझीलंडचा निम्मा संघ माघारी धाडला. कुलदीप यादवनं दोन, तर अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजानं एकेक विकेट काढली.























