LIVE UPDATES | कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर बंद ठेवण्याबाबत निर्णय झालेला नाही
ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगला अटक, आज कोर्टात सादर करणार आशिष शेलारांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवू नये, अनिल परब यांचा टोला जवळपास 320 कोटी रुपयांंच्या 28 अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी, रोजगारांची होणार निर्मिती बोगदा बनवून दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी; नगरोटा चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांचा मोठा खुलासा दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज बिल सवलतीच्या मुद्यावर चर्चा, मात्र निर्णय नाही
वीज बिल सवलतीवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजी नाट्य सुरू असताना कालच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. मात्र बैठकीत सविस्तर चर्चा होऊनही निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळेच मंत्रीमंडळाची बैठक संपल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत माध्यमांशी काही न बोलता निघून गेले.
काल सकाळीही राऊत यांनी याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. वीज बिलात सवलत द्यायची असेल तर साधारणपणे 2 हजार कोटी रुपयांची गरज आहे. मात्र हा निधी द्यायला अद्याप अर्थमंत्री तयार नाहीत. त्यामुळे नितीन राऊत आणि काँग्रेसची अडचण झाली आहे.
काँग्रेसच्या खात्याच्या मंत्र्यांना अपेक्षित निधी मिळत नसल्याची भावना काँग्रेस नेत्यांमध्ये आहे. शिक्षण विभागासंबंधित ज्या शाळा 100 टक्के विना अनुदानित आहेत, त्यांना सरसकट 20% अनुदान देण्याचा निर्णय घेतला. तर ज्या शाळांना 20% अनुदान होतं त्यांना अजून 20% अनुदान देऊन एकूण 40% अनुदान देण्याचा निर्णय झाला. पण याबाबतही निधी देण्यात आला नाही. एकीकडे दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी हजार कोटींचे पॅकेज एसटी महामंडळाला देण्यात आले आहे. कारण, परिवहन खातं शिवसेनेच्या अनिल परब यांच्याकडे येतं. पण दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांच्या खात्या संदर्भातील निर्णयाबाबत आर्थिक तरतूद होत नसल्याचे काँग्रेस मंत्र्यांची भावना आहे. दुजाभावावरून काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये असंतोष असल्याचेही समोर आलं आहे.
कोरोना लसीची भारतात किंमत काय असेल? सीरम इन्स्टिट्युटचे अदार पुनावाला म्हणतात...
कोरोना लसीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. लवकरच कोरोना व्हायरसवरील लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र या क्षणी प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न सतत निर्माण होत आहे की कोरोना लसीसाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतील? ही लस सर्वसामान्यांसाठी नेमकी कधी उपलब्ध असेल? ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची अॅस्ट्रेजेनिकासोबत चाचणी करणारे पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितलं की, भारतात कोरोनाच्या लसची किंमत 500 ते 600 रुपयांच्या दरम्यान असेल.
एका मुलाखती पूनावाला यांनी सांगितलं की, 2021 च्या पहिल्या तिमाहीत ऑक्सफोर्डच्या कोविड 19 लसचे सुमारे 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध होती. या लसीसाठी सामान्य लोकांना 500 ते 600 रुपये द्यावे लागतील. भारत सरकारला ही लस स्वस्त दरात दिली जाईल. भारत आमची प्राथमिकता असल्याचं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांनी म्हटलं आहे.
अमेरिकन औषध निर्माता कंपनी मोडेर्नाने सोमवारी जाहीर केले की कोविड 19 साठीची आमची लस 94.5 टक्के प्रभावी आहे. यापूर्वी, अमेरिका आणि जर्मनी यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या फायझर (Pfizer) आणि बायोटिक यांनी देखील अशीच घोषणा केली होती. या दोन्ही लसींचा तिसरा टप्प्यातील चाचणी दरम्यान चांगला निकाल लागला आहे आणि नियामकाच्या मान्यतेनंतर, लोकांना लस डोस देण्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू केले जाऊ शकते.
असा असेल भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियन दौरा, तीनही फॉर्मेटसाठी संघनिवड
भारतीय क्रिकेट संघ दोन महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. हा दौरा कोविड-19 साथीच्या दरम्यान होत आहे. मुंबई इंडियन्सला आरपीएलचा पाचवा किताब जिंकूण देणारा रोहित शर्मा आणि बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरलेला इशांत शर्मा नंतर या संघात सामील होणार आहे. हे दोघे टेस्ट संघाचा एक भाग आहेत.
भारतीय संघ 27 नोव्हेंबरपासून तीन एकदिवसीय, तीन टी -20 आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. सिडनी आणि कॅनबेरा येथे 27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरदरम्यान एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळल्या जातील. अडलेडमध्ये कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून डे नाईट स्वरुपात होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीला पॅटर्निटी रजा देण्यात आली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याची पत्नी अनुष्का शर्मा आई होणार आहे.