(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs Australia 2020-21 Full Schedule : असा असेल भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियन दौरा, तीनही फॉर्मेटसाठी संघनिवड
Australia vs India 2020-21 T20, ODI, Test Match Full Schedule: भारतीय क्रिकेट संघ तीन एकदिवसीय सामने, तीन टी -20 आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सिडनी आणि कॅनबेरा येथे 27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरदरम्यान एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळल्या जातील.
Australia vs India 2020-21 T20, ODI, Test Match Full Schedule
भारतीय क्रिकेट संघ दोन महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. हा दौरा कोविड-19 साथीच्या दरम्यान होत आहे. मुंबई इंडियन्सला आरपीएलचा पाचवा किताब जिंकूण देणारा रोहित शर्मा आणि बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरलेला इशांत शर्मा नंतर या संघात सामील होणार आहे. हे दोघे टेस्ट संघाचा एक भाग आहेत.
भारतीय संघ 27 नोव्हेंबरपासून तीन एकदिवसीय, तीन टी -20 आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. सिडनी आणि कॅनबेरा येथे 27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरदरम्यान एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळल्या जातील. अडलेडमध्ये कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून डे नाईट स्वरुपात होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीला पॅटर्निटी रजा देण्यात आली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याची पत्नी अनुष्का शर्मा आई होणार आहे.
वनडे सीरीज
- पहिला वनडे - 27 नोव्हेंबर, सिडनी
- दुसरा वनडे - 29 नोव्हेंबर, सिडनी
- तीसरा वनडे - 1 डिसेंबर, मानुका ओवल
टी-20 सीरीज
- पहिली मॅच - 4 डिसेंबर, मानुका ओवल
- दुसरी मॅच- 6 डिसेंबर, सिडनी
- तीसरा मॅच - 8 डिसेंबर, सिडनी
टेस्ट सीरीज
- पहिली टेस्ट- 17-21 डिसेंबर, अॅडिलेड
- दुसरी टेस्ट - 26-31 डिसेंबर, मेलबर्न
- तीसरी टेस्ट - 7-11 जानेवारी, सिडनी
- चौथी टेस्ट- 15-19 जानेवारी, ब्रिसबेन
भारतीय वनडे टीम : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकुर.
भारताची T-20 टीम : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि टी नटराजन
सचिन तेंडुलकरने बोल्ड झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन बॉलरला दिलेलं चॅलेंज तंतोतंत खरं ठरलं
भारताची टेस्ट टीम : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह , मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज आणि रोहित शर्मा.
ऑस्ट्रेलियाची टेस्ट टीम : डेविड वार्नर, जो बर्न्स, स्टीव स्मिथ, कँमरन ग्रीन, सीन एबॉट, पँट कमिन्स, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नाथन ल्योन, मायकल नेसर, टिम पेन (कर्णधार), जेम्स पँटिसन, मिशेल स्टॉर्क, मॅथ्यू वेड, विल पुकोस्वकी आणि मिशेल स्वेपसन
भारतीय संघाचा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौरा; वेळापत्रक जाहीर
ऑस्ट्रेलियाची वनडे आणि टी-20 टीम : आरोन फिंच (कर्णधार), सीन एबोट, अॅश्टन एगर, एलेक्स कैरी, पँट कमिन्स, कँमरन ग्रीन, जोश हेजलवुड, मोयजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल सँम्स, केन रिचर्डसन, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टॉर्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डेविड वार्नर आणि अॅडम जंपा