Farmer Success Stories : पैठणच्या शेतकऱ्याला शिमला मिरचीने केले मालामाल; मिळतेय लाखोचे उत्पादन
Farmer Success Stories : आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न अवघ्या एकरभर क्षेत्रातून या शेतकऱ्याच्या पदरात पडले आहे.
Farmer Success Stories : पारंपरिक शेतीला फाटा देत छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) पैठणच्या तालुक्यातील हर्षी येथील एका तरुण शेतकऱ्याने शिमला मिरचीच्या पिकाचा यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी विभागाकडून शेड नेट हाऊस घेऊन 40 गुंठे जमिनीमध्ये शिमला मिरचीची लागवड केली. तर केवळ एक एकर क्षेत्रावर या तरुण शेतकऱ्याने शिमला मिरचीची लागवड करून आतापर्यंत पाच टन उत्पादन घेतले आहे. आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न अवघ्या एकरभर क्षेत्रातून त्यांच्या पदरात पडले आहे. कृष्णा आगळे असे या शेतकऱ्याचं नाव आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करतोय. आधीच पारंपारिक पिकांना योग्य भाव मिळत नाही आणि त्यातच अतिवृष्टीमुळे शेत्कात्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. दरम्यान अशात पैठणच्या हर्षी येथील एका पदवीधर शेतकऱ्याने पारंपारिक पिकाला फाटा देत, एका एकामध्ये शिमला मिरचीचा योग्य पध्दतीने नियोजन करून यशस्वी प्रयोग केला आहे.
आगामी काळात 18 ते 20 टन शिमला मिरचीचे उत्पादन
कृष्णा आगळे यांचे बी.ए शिक्षण झाले आहे. तर त्यांचा पत्नी जयश्री आगळे यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांना दहा एकर शेती आहे. शेतातील बोअरवेल, विहीरीला पाणी अल्पप्रमाणात होते. त्यामुळे पाण्याअभावी उत्पन्न खूपच कमी होत होते. गत दोन-तीन वर्षांपासून पावसाचे पाणी अनियमितता त्यामुळे खर्च जास्त उत्पन्न कमी होत होते. त्यामुळे काही तरी नवीन प्रयोग करून शेती करावी, असा आगळे यांनी विचार केला. यासाठी त्यांनी शिमला मिरची लावण्याचा निर्णय घेतला. शिमला मिरची लावण्यासाठी कृष्णा यांनी कृषी विभागातून 40 गुंठे जमिनीवर ग्रीन शेडनेट हाऊस उभे केले. या शेड हाऊसमध्ये 8 हजार रोपे आणून लावली. तर महिन्याभरापासून या शिमला मिरचीचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाली अन् महिन्याकाठी एक लाख रुपये मिळाले आहेत. हा माल सुरत, पुणे, परभणी, नांदेड, हिंगोलीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जात आहे. आगामी काळात 18 ते 20 टन शिमला मिरचीचे उत्पादन त्यांना अजून अपेक्षित आहे.
एक एकर क्षेत्रातून सहा लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न
सध्या तीस रुपये किलोपर्यंतचा दर मिळाल्याने शिमला मिरचीचे दीड लाख रुपयेपेक्षा अधिकचे उत्पन्न आतापर्यंत प्राप्त झाले आहे. हा दर कायम राहिला किंवा त्यापेक्षा दर काही प्रमाणात कमीही झाला तरी एक एकर क्षेत्रातून सहा लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न प्रयोगशील शेतीमुळे मिळणार आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असताना शिमला मिरचीचं प्रयोग यशस्वी ठरला असून, यात आई-वडील यांच्यासह पत्नीची मदत मिळाली असल्याचा कृष्णा म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: