एक्स्प्लोर

Forest Department Transfer : सुधीर मुनगंटीवार यांच्या वन विभागात पैशांच्या मोबदल्यात बदल्या झाल्याचा आरोप

Forest Department Transfer : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विभागामध्ये पैशाच्या मोबदल्यात बदल्या झाल्याचा आरोप आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी "माझ्या अनुपस्थितीमध्ये बदल्या झालेल्या नाहीत" असं म्हटलं आहे.

Forest Department Transfer : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या विभागामध्ये (Forest Department) पैशाच्या मोबदल्यात बदल्या झाल्याचा आरोप आहे. त्याबाबत खुद्द भाजपच्याच चार आमदारांची वनमंत्र्याकडे तक्रार करण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार परदेशात असताना 200 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या बदल्या पैशांच्या मोबदल्यात केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी "माझ्या अनुपस्थितीमध्ये बदल्या झालेल्या नाहीत. बदल्यांसंदर्भात जे अधिकार आहेत ते मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तरीही मी आमदारांच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश दिले आहेत" असं सांगितलं.

या प्रकरणावर सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहेत. "माझ्या अनुपस्थितीमध्ये बदल्या झालेल्या नाहीत. बदल्यांसंदर्भात जे अधिकार आहेत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. बदल्या या गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही तुमच्या स्तरावर पारदर्शक पद्धतीने करा असे मी आदेश दिलेले आहेत. आर्थिक देवाणघेवाणीची चर्चा नव्हती. यामध्ये काही आमदारांनी अधिकाऱ्यांविषयी गंभीर तक्रारी केल्या आहेत म्हणून मी माझ्या विभागाला सूचना केली, त्याची सगळी माहिती घेऊन चौकशी करा. चांगली जागा कोणालाही देताना त्याची गुणवत्ता तपासून घ्या. हे आता तपासल्यावर यासंदर्भात निर्णय हा विभाग घेईल, हे सुद्धा अधिकाऱ्यांचे आहेत. बदल्यांमध्ये मी गुंतावं अशा भूमिकेचा मी नाही. कारवाई निश्चितपणाने होईल, कुठेही शंका असेल तर कारवाई करा अशा सूचना दिल्या आहे," असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

प्रकरण नेमके काय?

वन खात्याने 31 मे 2023 रोजी 39 सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) यांच्या बदल्या केल्या, तर 12 जणांना त्याच जागेवर मुदतवाढ दिली. यात काही एसीएफच्या बदल्या प्रादेशिक टू प्रादेशिक, तर काही जणांना पुन्हा तोच विभाग दिल्याची तक्रार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. या बदल्यांमध्येही अर्थकारण झाल्याची चर्चा थेट मंत्रालयात होत आहे. सहाय्यक वनसंरक्षकांच्या बदल्यांची फाईलसुद्धा वनमंत्र्यांनी मागवली आहे. त्यामुळे एसीएफच्या बदल्या थांबण्याची शक्यता आहे.

राज्यात सुमारे 200 पेक्षा जास्त वनपरिक्षेत्राधिकारी (आरएफओ) च्या बदल्यांमध्ये गैरप्रकार झाले आहेत. अनियमितता झाल्याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एस.पी. राव आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमीता बिश्वास यांची सोमवार, 5 जून रोजी वन मंत्रालयात प्रधान सचिवांच्या दालनात पेशी होणार आहे. 

वनीकरण, वन्यजीव विभागात बदल्या झाल्याची तक्रार केली आहे. 

आरएफओंच्या बदल्या करतानाचे आमदारांच्या तक्रारीच्या अनुषंगाने निकष कोणते, कोणत्या चौकशीदरम्यान पाणी कुठे मुरले, नियमावलींचे पालन केले, याचा शोध घेतला जाणार आहे. 

प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी बदल्या केल्यानंतर त्यांना स्थगिती देण्याचा प्रकार वन विभागात पहिल्यांदाच घडला आहे. आरएफओंच्या बदल्यांमध्ये अर्थकारण, गैरप्रकार झाल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे वनमंत्री मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार बदल्यांना स्थगिती देताना आरएफओंच्या बदली प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. 

पीसीसीएफ राव आणि एपीसीएफ बिश्वास यांना आरएफओंच्या बदल्यांची फाईल घेऊन जावे लागणार आहे. अनियमितता कुठे झाली? याबाबतची सखोल चौकशी केली

कोणी तक्रारी केल्या आहेत?

हरिभाऊ बागडे, राम सातपुते, रणधीर सावरकर आणि आशिष जयस्वाल या चार आमदारांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली आहे.

VIDEO : Sudhir Mungantiwar: सुधीर मुनगंटीवार यांच्या खात्यात पैसे घेऊन बदल्या?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar's NCP forms shadow cabinet : सरकारच्या १०० दिवसांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापनाABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 pm 28 February 2025Santosh Deshmukh Case | देशमुख हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल; 1758 पानांच्या आरोपपत्रात नेमकं काय?Top 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 28 Feb 2025 | 4 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Uttarakhand Badrinath Massive Avalanche : उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
Nagpur Crime News: नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल 
नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल
Prakash Ambedkar : योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, प्रकाश आंबेडकर संतापले; पुणे पोलिसांवरही ओढले ताशेरे
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, प्रकाश आंबेडकर संतापले; पुणे पोलिसांवरही ओढले ताशेरे
जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड!
जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.