ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जानेवारी 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जानेवारी 2025 | शुक्रवार
1. महाराष्ट्रात GBSचा धोका वाढला, पुणे शहर परिसरात आत्तापर्यंत जीबीएसचे 130 रुग्ण आढळले; राज्यातील मृतांची संख्या 4 वर; सोलापुरात एक, पुण्यात दोन तर पिंपरी चिंचवडमध्ये एकाचा बळी https://tinyurl.com/mr2kr2cs पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसचा पहिला बळी! 36 वर्षीय ओला चालकाचा 9 दिवसांत मृत्यू https://tinyurl.com/4z55sc8d कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा रुग्ण आढळला, डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार सुरु https://tinyurl.com/mr4x67vv
2. धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, त्यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा, महंत नामदेवशास्त्रींकडून पाठराखण, तर ज्यांनी संतोष देशमुखांना मारलं, त्यांची मानसिकताही विचारात घ्यायला हवी, पाठराखण करताना नामदेवशास्त्रींचं वक्तव्य https://tinyurl.com/3k779cdy भगवानगड आणि नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन; मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5anycac6 धनंजय मुंडेंकडून भगवान गडाचा राजकीय वापर, नामदेवशास्त्रींना बोलायला भाग पाडलं; अंजली दमानिया कडाडल्या https://tinyurl.com/45eju899
3. संत महंत समाज घडवणारे न्याय मंदिर, आरोपींचं समर्थन हे राज्याचं मोठं दुर्दैव, महंत नामदेवशास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगे यांची टीका https://tinyurl.com/46jhr2vd न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले,स्त्री-पुरुष भेद केला, प्रकाश महाजनांची टीका https://tinyurl.com/ydnw7bkn एका चापटीच्या बदल्यात खून करायची मानसिकता केली तर दिवसा मुडदे पडतील, धनंजय देशमुख यांचं नामदेवशास्त्रींना प्रत्युत्तर https://tinyurl.com/4vp9mze5
4. वाळू माफीयांशी साटेलोटे करणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित, बीडमध्ये पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांच्याकडून मोठी कारवाई https://tinyurl.com/4m32xrfw
5. बुरखा हा आमच्या धर्माचा आणि आस्थेचा विषय; आम्ही बुरखा घालूनच परीक्षा देणार; एका विशिष्ट समाजाला टार्गेट करुन वक्तव्ये करणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई करा, मुस्लीम विद्यार्थिनींची शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी https://tinyurl.com/yf5xmx37 परीक्षा केंद्रावरील बुरख्यावरुन वाद पेटला, नितेश राणेंना दादा भुसेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले, कोणताही विद्यार्थी कॉपी करणार नाही याची विभाग काळजी घेतोय https://tinyurl.com/nz33z5uh
6. मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी पुन्हा उघड https://tinyurl.com/47wkawyx
7. मी पुन्हा येईन हे वाक्य माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी https://tinyurl.com/5n88xk7j पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव, माजी मंत्री प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत https://tinyurl.com/3uxd92kj नितीन गडकरी यांच्या नागपुरातील ड्रीम प्रोजेक्टला जबर धक्का; अज्ञात व्यक्तीकडून शेकडो झाडांची कत्तल, गुन्हा दाखल https://tinyurl.com/52vhb6ba
8. मुख्याध्यापकाकडून केजीमध्ये शिकणाऱ्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, यवतमाळ जिल्ह्यातील संतापजनक प्रकार https://tinyurl.com/2vnh9csa वरळीत तीन वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण, पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली, तीन तासात मुलगी आई वडिलांकडे सुपूर्द, आरोपी महिलेला बेड्या https://tinyurl.com/yc4vtm3p
9. लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी https://tinyurl.com/43stk43r
10. सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार जाहीर; BCCI च्या हेड ऑफिसमध्ये जंगी कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा होणार https://tinyurl.com/mrx5vxbh इंग्लंडला धोबीपछाड, भारतीय मुलींनी थाटात टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मारली धडक, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार https://tinyurl.com/24yefe6b
एबीपी माझा स्पेशल
निर्मला सीतारामन यांच्या पेटाऱ्यातून गरीब, मध्यमवर्गीयांसाठी नेमकं काय येणार? सामान्यांना दिलासा मिळणार का? केंद्रीय अर्थसंकल्पाचं महाकव्हरेज, उद्या दिवसभर एबीपी माझावर! https://tinyurl.com/y6w7djpj
आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर, 2025 मध्ये विकास दर, महागाई कशी राहणार? https://tinyurl.com/4kj8sz9f
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
