(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farmer Suicide : विदर्भात गेल्या 16 महिन्यात 1784 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
विदर्भात आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नाहीये, पण कोविडच्या संकटासमोर त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या 16 महिन्यात सर्वात जास्त आत्महत्या राज्यात यवतमाळ मध्ये बघायला मिळाल्या आहेत.
नागपूर : एकीकडे देश गेली दीड वर्ष कोरोनाच्या भीषण संकटाशी झुंज देत असताना, विदर्भाच्या शेतकऱ्याचा सामना दुहेरी सुरु आहे. कोविडसह त्याला मात्र शेतीच्या संकटाला ही सामोरे जावे लागते आहे आणि ह्याचा परिणाम आहे न थांबलेल्या आत्महत्या. कोविड मृत्यूमध्ये शेतकरी आत्महत्येचा प्रश्न हा गेली 16 महिने दडून गेला आहे. गेल्या 16 महिन्यात एकट्या विदर्भात 1784 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, म्हणजेच महिन्याला चक्क 111 शेतकरी जीव देत आहेत
विदर्भात आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नाहीये, पण कोविडच्या संकटासमोर त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या 16 महिन्यात सर्वात जास्त आत्महत्या राज्यात यवतमाळ मध्ये बघायला मिळाल्या आहेत.
गेल्या मोसमात सोयाबीन आणि कपाशीवर आलेला रोग, मार्केट मधील खोटी बियाणे, घेतलेले कर्ज आणि ते न फेडू शकल्यामुळे सावकाराचा मागे लागलेला तगादा तर अनेक ठिकाणी आलेल्या पिकाला कोवीडच्या नावावर झालेली खरेदीची प्रचंड देरी ह्या सर्वाची परिणीती या आत्महत्या आहेत. ह्यात काही पाऊले उचलल्या गेली तर परिस्थिती सुधरू शकते असे शेतकरी समस्यांचे एक्स्पर्टसचे म्हणणे आहे पण ते होत नाही. सरकारने धोरणात हवे असलेले बदल केले नाहीत असा आरोप आहे.
- विदर्भाच्या शेतकरी आत्महत्या
- महिने -16
- आत्महत्या - 1784
- महिन्याची आत्महत्या सरासरी - 111
- यवतमाळच्या आत्महत्या - 402
- वर्धा जिल्ह्यातील आत्महत्या - 193
आत्महत्या केलेल्या हतबल परिवारांसाठी तर अजून एक प्रश्न मोठा आहे. तो म्हणजे ह्या आत्महत्यांमध्ये खूप कमी आत्महत्यांना आजही मदतीसाठी अपात्रच ठरवण्यात येत आहे.
शेतकरी आत्महत्येला इतरही बरेच कंगोरे आहेत. एकीकडे दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर बारीक नजर ठेवून त्यावर सतत वक्तव्य करणाऱ्यांना ह्या आत्महत्या दिसत नाहीयेत का? आज मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाला महत्वाचे असणारे महामंडळ अजून ही गठीत झाले नाहीये. आजही हाल ह्यामुळे आहे कारण इथली शेती कोरडवाहू आहे. त्याचे उत्तर म्हणजे सिंचन प्रकल्पाना विदर्भात वेग देणे. मात्र ते लक्ष खरंच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.