एक्स्प्लोर

Jalna Accident : जालन्यात कारमध्ये महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला नवं वळण, पतीला बेड्या; नेमकं काय घडलं?

Jalna Accident Update: काही दिवसांपूर्वी जालन्यात एका महिलेचा कारमध्ये जळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी मंठा पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

Maharashtra Jalna Accident Update: जालन्यातील (Jalna News) महिलेचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाल्या प्रकरणी आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मृत महिलेच्या पतीला मंठा पोलिसांकडून (Mantha Police) अटक करण्यात आली आहे. महिलेचा मृत्यू अपघाती (Accident News) नसून पतीनंच तिच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळेच पोलिसांनी पतीला अटक केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जालन्यात एका विचित्र अपघाताची चर्चा चांगलीच रंगली होती. गाडीला मागून धडक दिल्यामुळे पती वाद घालण्यासाठी गाडीतून खाली उतरला आणि तेवढ्यात गाडीनं पेट घेतला होता. त्यामध्ये पत्नीचा गाडीत होरपळून मृत्यू झाला होता. 

काही दिवसांपूर्वी जालन्यात एका महिलेचा कारमध्ये जळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी मंठा पोलिसांनी पतीला अटक केली आहे. टेम्पोनं कारला धडक दिल्याचा कट पतीनं रचल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना 23 जून रोजी घडली होती. सविता सोळुंके या महिलेचा मृत्यू झाला होता, तर पती सुखरुप बचावला होता. 

काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी? 

जालना जिल्ह्यातील तळणी फाटा येथे एका गाडीचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर कारनं पेट घेतल्यानं एका 33 वर्षीय महिलेचा जळून अक्षरशः कोळसा झाल्याची घटना घडली होती. पहाटे 4 च्या सुमारास पती-पत्नी दर्शनासाठी शेगाव येथून गावाकडे परत येत होते. तेवढ्यात रस्त्यातच स्विफ्ट कारला मागून एका पीकअपनं धडक दिली. पिकअप वाल्याशी भांडायला पती रागातच गाडीतून उतरला आणि तेवढ्यात गाडीनं पेट घेतला असल्याची माहिती मिळाली होती. अपघातानंतर पती गाडीतून खाली उतरताच कारनं अचानक पेट घेतला. क्षणार्धातच आगीनं संपूर्ण कार जळाली. आग लागली तेव्हा पत्नी गाडीत होती, वेळत आगीवर नियंत्रण मिळवता न आल्यानं स्थानिक पोलिसांना बोलवण्यात आलं.

पोलिसांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत कारमधील सविता सोळुंके या 33 वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाला होता. सदर घटनेची माहिती मयत महिलेच्या पतीच्या भावानं पोलिसांना दिली होती. या प्रकरणी पोलीस वेगवेगळ्या अँगलनं तपास करत होते. पोलीस तपासात अपघात झाला नसून पतीनंच पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Jalna Accident: गाडीला पिकअपची धडक, पती भांडण्यासाठी खाली उतरताच कारनं घेतला पेट; पत्नीचा होरपळून मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC Exam Paper Leak : दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
वकिलांवर सरकारी पाळत ते संप-बहिष्कारावर बंदी! देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात 
वकिलांवर सरकारी पाळत ते संप-बहिष्कारावर बंदी! देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात
Nashik News : नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जमावबंदी लागू, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जमावबंदी लागू, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव पुढं केलं, भास्कर जाधवांपुढं नाराजीशिवाय पर्याय नाही : नितेश राणे
भास्कर जाधव यांना सतरंजी उचलणे, मोबाईल उचलणे अशी काम राहिलेत, नाराजीशिवाय पर्याय नाही: नितेश राणे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr Tara Bhavalkar: 10वी पर्यंतच शिक्षण मराठीतच हवं,मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा तारा भवाळकरांचं भाषणABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 22 February 2025Nitesh Rane : ठाकरेंच्या शिवसेनेवर थेट 'प्रहार'राणे म्हणातात..कर्जाची परतफेड व्याजासहABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 22 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC Exam Paper Leak : दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
वकिलांवर सरकारी पाळत ते संप-बहिष्कारावर बंदी! देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात 
वकिलांवर सरकारी पाळत ते संप-बहिष्कारावर बंदी! देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात
Nashik News : नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जमावबंदी लागू, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जमावबंदी लागू, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव पुढं केलं, भास्कर जाधवांपुढं नाराजीशिवाय पर्याय नाही : नितेश राणे
भास्कर जाधव यांना सतरंजी उचलणे, मोबाईल उचलणे अशी काम राहिलेत, नाराजीशिवाय पर्याय नाही: नितेश राणे
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
Embed widget