एक्स्प्लोर

मोठी बातमी! जालन्यात नामांकित स्टील कंपनीत आयकर विभागाची धाड

Income Tax Department Raid In Jalna : आयकर विभागाकडून कंपनीतील काही महत्वाची कागदपत्रे आणि संगणकातील डेटा ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे.

Income Tax Department Raid In Jalna : जालना (Jalna) येथे एका नामांकित स्टील कंपनीवर (Steel Company) आयकर विभागाकडून धाड (Income Tax Department) टाकण्यात आली आहे. कर चूकवेगिरीच्या संशयावरून मुंबईतील (Mumbai) आयकर विभागाच्या पथकाकडून कालपासून हे धाडसत्र सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यात आयकर विभागाकडून कंपनीतील काही महत्वाची कागदपत्रे आणि संगणकातील डेटा ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे. संबंधित कंपनीमध्ये जमा खर्चाचा संशयास्पद व्यवहार आढळल्याची देखील माहिती आहे. 

जालना येथे एका नामांकित स्टील कंपनीत आयकर विभागाच्या तब्बल 200 जणांच्या पथकाकडून  गुरुवारी पहाटे 6 वाजेदरम्यान अचानक धाड टाकण्यात आली. विशेष म्हणजे या कंपनीसह संचालक व एका उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांच्या घरांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या जमा- खर्चाच्या व्यवहारात काही संशयास्पद बाबी आढळून आल्याने  ही कारवाई करण्यात आली आहे. तर, आतापर्यंत कारवाईत नेमकं काय काय मिळून आले याची अधिकृत कोणतेही माहिती समोर आलेली नाही. 

अन् पथक अचानक धडकलं...

जालना शहरात अनेक स्टील कंपन्या आहेत. काही नामंकित कंपन्यांमधील स्टील देशभरात विक्रीसाठी जाते. मात्र, अनेकदा कर चुकवल्या प्रकरणी किंवा व्यवहारात संशयास्पद बाबी आढळून आल्यास वेगवेगळ्या विभागाकडून कारवाया केल्या जातात.  अशीच कारवाई गुरुवारी करण्यात आली आहे. जालना एमआयडीसीमध्ये असलेल्या या स्टील कंपनीत गुरुवारी सकाळी 6 वाजता अचानक आयकर विभागाचं पथक पोहचलं. फक्त कंपनीच नाही तर कंपनीच्या संचालकासह एका उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांच्या घरांवर देखील धाड टाकण्यात आली आहे. कालपासून सुरु असलेली चौकशी अजूनही सुरूच असल्याची माहिती मिळत आहे. 

एकाला ताब्यात घेतलं...

200 जणांचे आयकर विभागाचे पथक गुरुवारी जालन्यात दाखल झाले. मुंबईतील हे पथक असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित स्टील कंपनीच्या व्यवहारात संशयास्पद बाबी आढळून आल्याने आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, या कंपनीतील मालाच्या खरेदी-विक्री आणि इतर आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या एकाला जालना तालुक्यातील दरेगावातून राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील जालना येथील स्टील कंपन्यांवर जीएसटी विभागासह आयकर विभागाने कारवाया केल्या आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Jalna : चार्जिंगला लावलेला मोबाईल कानाला लावला अन् स्फोट झाला, 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule On Devendra Fadnavis:महाराष्ट्राच्या स्थितीवर एकत्रित चर्चा व्हावी,सुप्रियाताईंची मागणीABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines7 PM 15 March 2025Bhandara Farmer : महिला शेतकऱ्याची उत्तुंग भरारी, शेतात बागायतीचा आधुनिक प्रयोगABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
नाना पटोलेंचा यु-टर्न, म्हणाले, होळीमुळे गंमत केली; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Embed widget