ISRO : चांद्रयान-3 नंतर इस्रोचं नवं मिशन! PSLV-C56 चं 30 जुलैला प्रक्षेपण; सात उपग्रह अंतराळात पाठवणार
ISRO PSLV-C56 : चांद्रयान-3 नंतर इस्रो नवीन मोहीमेसाठी सज्ज झालं आहे. सात उपग्रहांसह PSLV-C56 30 जुलैला अवकाशात प्रक्षेपित केलं जाईल.
ISRO New Space Mission : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो (ISRO) आता एका नवीन मोहीमेसाठी सज्ज झालं आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) आपल्या पुढील मोहिमेची तयारी करत आहे. भारतीय अंतराळ संस्था अर्थात इस्रो 30 जुलै रोजी DS-SAR सॅटेलाईट आणि सहा सह-प्रवासी उपग्रहांसह PSLV-C56 मोहीम प्रक्षेपित करणार आहे.
इस्रो नवीन मोहीमेसाठी सज्ज
न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) च्या सहकार्याने ही मोहीम पार पाडली जाईल. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) 30 जुलैला पीएसएलव्ही (PSLV) रॉकेटद्वारे सिंगापूरच्या सात उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, PSLV-C56 कोडनेम असलेले PSLV रॉकेटमधून सिंगापूरच्या DS-SAR उपग्रहासह सात उपग्रहांचं प्रक्षेपण केलं जाईल.
30 जुलै रोजी PSLV-C56 चं प्रक्षेपण
इस्रो 30 जुलैला PSLV-C56 सह सहा सहप्रवासी उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. इस्रोने या संदर्भात माहिती दिली आहे. ISRO ने सांगितलं आहे की, PSLV-C56 सह सहा सह-प्रवासी उपग्रह 30 जुलै रोजी सकाळी 06.30 वाजता प्रक्षेपित केले जातील. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावर हे प्रक्षेपित केलं जाणार आहे.
भारत आणि सिंगापूरची संयुक्त मोहीम
PSLV-C56 ही भारत आणि सिंगापूर यांच्यातील संबंधाना आणखी बळ देणारी ठरेल. DS-SAR उपग्रह सिंगापूर सरकारच्या अंतर्गत सिंगापूरच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान एजन्सी (DSTA) आणि ST अभियांत्रिकी यांच्या भागीदारी तयार करण्यात आला आहे. पीएसएलवी-सी56 द्वारे सहा सह-प्रवासी उपग्रह प्रक्षेपित केले जातील. यामध्ये वेलॉक्स-एएम (Velox-AM), आर्केड (Arcade), स्कूब-II (Scoob-II), न्यूलायन (NewLion), गॅलासिया-2 (Galacia-2) आणि ओआरबी-12 स्ट्राइडर (ORB-12 Strider) यांचा समावेश आहे.
🇮🇳PSLV-C56🚀/🇸🇬DS-SAR satellite 🛰️ Mission:
— ISRO (@isro) July 24, 2023
The launch is scheduled for
📅 July 30, 2023
⏲️ 06:30 Hrs. IST
🚩First launch pad SDSC-SHAR, Sriharikota. @NSIL_India has procured PSLV-C56 to deploy the DS-SAR satellite from DSTA & ST Engineering, Singapore
and 6 co-passenger… pic.twitter.com/q42eR9txT7
सर्व हवामानात काम करण्यास अनुकूल
DS-SAR मध्ये इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) द्वारे विकसित सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) पेलोड आहे. हे DS-SAR ला सर्व हवामान परिस्थितीत दिवस आणि रात्र माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :