एक्स्प्लोर

ISRO Gaganyaan : चांद्रयान-3 नंतर इस्त्रो नव्या भरारीसाठी सज्ज! गगनयानच्या इंजिनाच्या महत्त्वाच्या भागाची चाचणी यशस्वी

ISRO Gaganyaan Mission : गगनयान हे भारतीय अंतराळ संस्थेची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहीमे अंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे.

ISRO Tested Gaganyaan SMPS : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारत आता नव्या गगनयान अंतराळ मोहीमेसाठी (ISRO Gaganyaan Mission) सज्ज झाला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रोनं (ISRO) मानवी अंतराळ मोहीमेच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. इस्त्रोकडून गगनयानच्या इंजिनची चाचणी यशस्वी झाली आहे. इस्रोने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. गगनयान हे भारतीय अंतराळ संस्थेची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. इस्रोने ISRO ने गगनयान सर्व्हिस मॉड्युल प्रोपल्शन सिस्टीम (Service Module Propulsion System) म्हणजेच SMPS ची यशस्वी चाचणी केली आहे. 

गगनयानच्या इंजिनची चाचणी यशस्वी

इस्रोने गगनयान सर्व्हिस मॉड्युल प्रोपल्शन सिस्टीम (Service Module Propulsion System) ची चाचणी यशस्वी केली आहे. गगनयानचे सर्व्हिस मॉड्युल एक नियंत्रित द्वि-प्रोपेलेंट आधारित प्रणाली आहे. जी ऑर्बिटल मॉड्यूलच्या गरजा पूर्ण करते. यामध्ये ऑर्बिट इंजेक्शन, परिक्रमा, ऑन-ऑर्बिट कंट्रोल, डी-बूस्ट मॅन्युव्हरिंग आणि चढाईच्या टप्प्यात मदत करते.

इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम

इस्रोने 2023 मध्ये गगनयान मोहीम हाती घेतली आहे. यावर्षाच्या शेवटी गगनयानचं प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. गगनयान ही भारताची पहिली मानव मोहीम अंतराळात असेल. यामध्ये तीन अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यात येईल. 2023 मध्ये गगनयानच्या प्रत्यक्ष उड्डाण करण्यापूर्वी तीन चाचणी मोहिमा केल्या जातील. या तीन चाचणी मोहिमा मानवरहित असतील. या चाचणी मोहिमांसाठी रोबोट अंतराळात पाठवला जाईल. यासाठी एक ह्युमनॉइज रोबोट पाठवला जाईल. इस्रोने 'व्योमित्र' नावाचा महिला रोबोट तयार केला असून तो चाचणीसाठी अवकाशात पाठवला जाईल. हा 'हाफ-ह्युमनॉइड' रोबोट अवकाशातून इस्रोला अहवाल पाठवेल.

सर्व्हिस मॉड्यूल सिस्टीम (SMPS) चं काम काय?

सर्व्हिस मॉड्यूलमध्ये सिस्टीम हे अंतराळयानाच्या इंजिनप्रमाणे काम करतं. हे मुख्य प्रोपल्शन इंजिन असते. याचा वापर अंतराळयानाला चंद्राभोवती कक्षेत ठेवण्यासाठी आणि चंद्रावरून पृथ्वीच्या दिशेने पाठवण्यासाठी केला जातो. चंद्रावर आणि तेथून दोन्ही प्रवासात अंतराळयानाचा मार्ग दुरुस्त करण्यासाठी देखील या इंजिनचा वापर केला जातो.

इस्रोची गगनयान मोहीम कशी असेल?

भारत आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेत अंतराळवीरही पाठवणार आहे, 3 दिवस अंतराळात पाठवले जाईल. जे सुमारे 400 किमी उंचीवर कक्षेत राहील. यानंतर अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहे. या मोहिमेसाठी वेगवेगळ्या चाचण्यांचेही नियोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट, टेस्ट व्हेईकल मिशन्स, पॅड अॅबॉर्ट टेस्ट, मानवरहित उड्डाण या चाचण्या करण्यात येतील. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर भारत गगनयानातून मानवाला अंतराळात पाठवणार आहे. 

स्नेहल पावनाक
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Crime News: पाय बांधले, गळा कापला अन् डोक्यात वार..., वाराणसीत प्रियकराच्या भाड्याच्या खोलीत सापडला प्रेयसीचा कुजलेला मृतदेह, पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्ये चक्रावणारी माहिती समोर
पाय बांधले, गळा कापला अन् डोक्यात वार..., वाराणसीत प्रियकराच्या भाड्याच्या खोलीत सापडला प्रेयसीचा कुजलेला मृतदेह, पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्ये चक्रावणारी माहिती समोर
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Embed widget